आजकाल अनेक जण वस्तू खरेदी करताना बरीच माहिती तपासतात. ही चांगली सवय आहे. सर्वप्रथम आपण एक्सपायरी डेट तपासतो. पण, तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही वस्तू कधीच खराब होत नाहीत. अनेकदा आपण वस्तू जुनी झाली म्हणून फेकून देतो, पण काही पदार्थ असे असतात जे योग्य प्रकारे साठवले तर कित्येक वर्षे टिकतात.
हे पदार्थ दीर्घकाळ साठवून ठेवल्यानंतरही त्यांच्या चवीमध्ये आणि गोडव्यात फरक पडत नाही. त्यांच्यातील पोषक तत्वेही दीर्घकाळ टिकून राहतात. ते फ्रिजमध्ये ठेवण्याचीदेखील गरज नसते. हे पदार्थ योग्य पद्धतीने साठवले तर बराच काळ वापरता येतात. महत्त्वाची बाब म्हणजे या पदार्थांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही. जाणून घेऊया अशा काही पदार्थांबद्दल, ज्यांची एक्सपायरी डेट नसते आणि त्यांना अनेक वर्षे सहजपणे वापरता येते.
तांदूळ हा असा एक पदार्थ आहे, जो योग्य प्रकारे साठवला तर कधीच खराब होत नाही. तुम्ही तांदूळ हावाबंद डब्यामध्ये ठेवा आणि दमटपणापासून दूर ठेवा. प्लास्टिक किंवा स्टीलच्या डब्यात साठवणे उत्तम राहील. जर तांदळात ओलावा किंवा कीड गेली नाही, तर तो वर्षानुवर्षे वापरता येतो.
साखर आणि मीठ हे देखील असे पदार्थ आहेत, जे कधीच खराब होत नाहीत. पण त्यांना ओलसरपणापासून वाचवणे महत्त्वाचे आहे. जर या पदार्थांमध्ये ओलावा गेला, तर ते घट्ट होतात आणि चव बदलू शकते. त्यामुळे साखर आणि मीठ नेहमी कोरड्या आणि हवाबंद डब्यात ठेवा. वापरण्यासाठी कोरड्या चमच्याचा (स्पूनचा) वापर करा.
सोया सॉस देखील अनेक वर्षे टिकतो, कारण त्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, जे नैसर्गिकरित्या किटकांना वाढू देत नाही. सोया सॉस टिकवण्यासाठी तुम्ही काचेच्या बाटलीत स्टोअर करू शकता. ही बाटली थंड आणि कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी ठेवा.
व्हिनेगर हे देखील कधीच खराब न होणाऱ्या पदार्थांमध्ये येते. यामध्ये नैसर्गिक किटनाशक गुणधर्म असतात. हेच कारण आहे की व्हिनेगर वर्षानुवर्षे टिकतो. तुम्ही व्हिनेगर फ्रिजमध्ये ठेऊ शकता, याला थंड ठिकाणी साठवणे योग्य ठरते.
हे ही वाचा: तुमच्या डोक्याला खूप खाज येते का? मग करा 'हे' 5 घरगुती उपाय, समस्या लगेच सुटेल
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)