धावत्या एसटीचे चाक अचानक निखळले, अन्....; वसई-वज्रेश्वरी मार्गावरील धक्कादायक Video समोर

Vasai Accident News: धावत्या एसटी बसचे चाक अचानक निखळल्याने एकच खळबळ उडाली होती. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 2, 2025, 12:47 PM IST
धावत्या एसटीचे चाक अचानक निखळले, अन्....; वसई-वज्रेश्वरी मार्गावरील धक्कादायक Video समोर title=
CCTV captures terrifying moment ST Bus oaded with passengers wheel comes off

Vasai Accident News: नाशिक-गुजरात महामार्गावर आज अपघाताची घटना घडली आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. वसईत देखील एक मोठी दुर्घटना घडली असती मात्र सुदैवाने मोठं संकट टळलं आहे. वज्रेश्वरी-वसई मार्गावर एका थरारक घटनेत धावत्या एसटी बसचे चाक अचानक निखळल्याने ३० प्रवाशांचे प्राण टांगणीला लागले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

वज्रेश्वरी-वसई मार्गावर एका थरारक घटनेत धावत्या एसटी बसचे चाक अचानक निखळल्याने ३० प्रवाशांचे प्राण सुदैवाने बचावले आहेत. सुदैवाने बसचालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवले आणि मोठी दुर्घटना टळली आहे. घटनेचा सीसीटीवी सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. एका गॅरेजच्या दुकानातील सीसीटीव्हीमध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. 

एसटी बस वज्रेश्वरीहून वसईकडे जात असताना पारोळ गावाजवळ आज दुपारी अचानक एसटीच्या पुढील टायर निखळले. टायर निखळल्याने बस डळमळू लागली आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही क्षणांसाठी बसचे नियंत्रण सुटण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, चालकाने तातडीने बस थांबवत सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात मोठी हानी झाली नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

नाशिकजवळ अपघात

शिक - गुजरात हायवेवर सापुतारा घाटात खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची तीव्रता सर्वात अधिक असून यामध्ये 7 जणांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातात 7 जण जागीच ठार तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पहाटे 5:30 वाजेच्या दरम्यान हा अपघात झाल्याची सांगण्यात येत आहे.