चिकन खाण्यावरुन वाद, मित्रानेच मित्राला कायमचे संपवले; पनवेलमधील घटना

Crime News In Marathi: पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चिकन पार्टीच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 2, 2025, 11:57 AM IST
चिकन खाण्यावरुन वाद, मित्रानेच मित्राला कायमचे संपवले; पनवेलमधील घटना  title=
panvel news friend killed young man over chicken party

Crime News In Marathi: पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. खारघरमध्ये एका क्षुल्लक कारणावरुन मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पार्टीसाठी पैसे न दिल्याने ही हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

खारघरमधील बेलपाडा आदिवासी वाडी येथील क्रिकेटच्या मैदानाजवळ लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर जोरदार प्रहार करून एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेलपाडा येथील क्रिकेटच्या मैदानाच्या बाजूला जयेश वाघ आणि त्याचे इतर मित्र चिकन बनवत होते. यावेळी मन्नू शर्मा या मित्राकडून चिकन पार्टीसाठी कोणतीही वर्गणी येत नसल्याच्या करणावरून जयेश आणि मन्नू या दोन मित्रांमध्ये वाद सुरु झाला. 

वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि हाणामारी पर्यंत गेले. जयेशने मन्नूला कानशिलात लगावली असता याचा राग आल्याने मन्नू याने जयेशला प्रथम हाताबुक्क्याने मारहाण केली आणि नंतर थेट क्रिकेटच्या बॅटने डोक्यावर आणि पाठीवर मारहाण केल्याने जयेश याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. 

याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात मन्नू शर्मा विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावलेय. एकूणच चिकनच्या पार्टीसाठी वर्गणी न देण्यावरून सुरु झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. 

नक्षलवाद्यांनी केली माजी पंचायत समिती सभापतीची हत्या

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कियर गावात नक्षलवाद्यांनी ग्रामस्थाची हत्या केली. सुखराम मडावी 45 असे आहे मयताचे नाव आहे. सुखराम माजी पंचायत समिती सभापती होते. सुखराम याला घरातून बाहेर नेत मैदानावर गळा आवळून हत्या करण्यात आली. नक्षलवाद्यांनी मृतदेहाजवळ पत्रक टाकले असून पत्रकात सुखराम पोलीस खबरी असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्याने या भागात पेनगुंडा येथे 3 दिवसांपूर्वी स्थापन झालेले पोलीस ठाणे निर्मितीत सहभाग घेतल्याचा आरोप पत्रकातून करण्यात आलाय. पोलिसांनी मात्र वृत्त फेटाळलं आहे. 2025 वर्षातील या प्रकारच्या पहिल्या घटनेने परिसर हादरला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत