योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक - गुजरात हायवेवर सापुतारा घाटात खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची तीव्रता सर्वात अधिक असून यामध्ये 7 जणांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बस 200 फूट दरीत कोसळल्याने हा अपघात झाल्याच सांगण्यात येत आहे.
या अपघातात 7 जण जागीच ठार तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पहाटे 5:30 वाजेच्या दरम्यान हा अपघात झाल्याची सांगण्यात येत आहे. अपघात इतका भीषण की, बसचे घाटात कोसळल्याने दोन तुकडे झाले आहेत. नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाल्याच सांगण्यात येत आहे. अपघात झालेल्या बसमधील सर्व मयत आणि जखमी मध्य प्रदेशमधील रहिवाशी असल्याच सांगण्यात येत आहे.
आंळदी येथून तुळजापूर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या बसला सोलापूरकडे जाताना अपघात झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने तुळजापूर जवळ असलेल्या घाटामध्ये बस पलटी झाली आहे. पोलीस आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवले आहे. जखमींना तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.