BCCI Awards 2025 Full Winners List: भारतीय क्रिकेट नियामक (BCCI Awards 2023-24) मंडळाने 1 फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजित कार्यक्रमात 2023-24 हंगामात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरला बीसीसीआयच्या वार्षिक 'नमन पुरस्कार'मध्ये (BCCI Naman Awards 2025) कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय जसप्रीत बुमराह-स्मृती मानधना या दोघांना सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि माजी दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यालाही विशेष सन्मान देण्यात आला. चला यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी पाहूयात...
हे ही वाचा: W/L बोर्ड पाहून ट्रेन चालक शिट्टी का वाजवतो? जाणून घ्या कारण
हे ही वाचा: टीम इंडियावर 'बेईमानीचा' आरोप! जाहीर पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार संतापला, झाला मोठा वाद
Say Cheese, say the #NamanAward Winners pic.twitter.com/QZYVrm4w1w
— BCCI (@BCCI) February 1, 2025
हे ही वाचा: मोठ्या उद्योगपतीच्या लेकीवर जडला टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा जीव, लव्हस्टोरी आहे एकदम फिल्मी
या पुरस्कार सोहळ्यात, विजेत्यांना ट्रॉफी तसेच रोख बक्षिसे, 50,000 ते 15 लाखांपर्यंत देण्यात आली. हा पुरस्कार केवळ खेळाडूंचाच सन्मान करत नाही तर तरुण आणि उदयोन्मुख क्रिकेटपटूंना एक मोठा व्यासपीठही देतो. याशिवाय बीसीसीआय नमन पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पंच आणि इतर अधिकाऱ्यांनाही गौरविण्यात आले. या भव्य कार्यक्रमाने भारतीय क्रिकेटच्या दिग्गजांना एका व्यासपीठावर एकत्र आणले आणि खेळाप्रती त्यांच्या मेहनतीला आणि समर्पणाला सलाम केला.