काजोल धाकट्या लेकीलाच संपवेल अशी तनुजा यांना होती भीती, तनिषाचा खुलासा

Tanishaa Mukerji: तनिषा मुखर्जी हिने एक वक्तव्य केलं आहे. तिच्या या वक्तव्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.   

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 2, 2025, 11:55 AM IST
काजोल धाकट्या लेकीलाच संपवेल अशी तनुजा यांना होती भीती, तनिषाचा खुलासा title=
Bollywood Actress Kajol Sister Tanishaa Says childhood fight with sister kajol her mom tanuja scared

Tanishaa Mukerji: काजोल आणि तनीषा मुखर्जी या दोघीही बहिणी पण काजोलला बॉलिवूडमध्ये फार यश मिळालं. तर तनीषाला थोडा संघर्ष करावा लागला. चित्रपटात दिसत नसली तरी अनेक रिअॅलिटी शोमध्ये तनीषा झळकली होती. अलीकडेच तनीषाने काजोलसंदर्भात एक खुलासा केला आहे. काजोल आणि तनीषामध्ये 4 वर्षांचे अंतर असून दोघीही बालपणी खूप भांडणं करायच्या. तनीषाने एका मुलाखतीत म्हटलं आहे की, काजोलमुळं तिच्या आईला नेहमी एक भीती सतावत असायची. 

हॉन्टरफ्लायला दिलेल्या एका मुलाखतीत, 'जेव्हा तनीषा मुखर्जीला तिच्या लहानपणीच्या आठवणींबद्दल विचारलं असता तिने म्हटलं आहे की, मला माझ्या पणजीआजीने सांभाळलं आहे कारण माझी आई कामासाठी बाहेर जायची. मी तीन बहिणी आणि एक भाऊ यांच्यासोबत मोठी झालीये. 

जेव्हा तनीषाला विचारण्यात आलं की काजोल आणि तिच्यातील बाँड कसं होतं. त्यावर तिने म्हटलं की, 'मी आणि काजोल आम्ही लहान असताना खूप भांडायचो. ती माझ्यापेक्षा मोठी होती आणि थोडी हेल्दीदेखील होती. जेव्हा ती मला मारायची तेव्हा आई घाबरायची आणि म्हणायची की, एक दिवस काजोल तनीषाला मारुन टाकेल. असं म्हणून ती आम्हा दोघींनाही फटके द्यायची. माझ्या आईला आम्ही दोघी घाबरायचो ती खूप शिस्तप्रिय होती. म्हणूनच आम्ही आज यशस्वी आहोत. आईने आमच्याबाबत कठोर पावलं उचलल्यामुळं आज आम्ही आमचं ध्येय साध्य करु शकलो,' असं तनिषाने म्हटलं आहे. 

तनिषाने वर्किंग वुमनबाबतही एक वक्तव्य केलं आहे. तिने म्हटलं आहे की, 'माझी आई वर्किंग वुमेन होती. पण ती वर्किंग वुमन नसायला हवी होती. माझा जन्म झाला तेव्हा तिला कुटुंबासाठी काम करावं लागायचं. आमच्याकडे तेव्हा पैसे नसायचे. माझी आई दररोज कमीत कमी दोन ते तीन शिफ्टमध्ये काम करायची. मला माझ्या आईला कधीच भेटता आलं नाही. पण तिचा सहवास मला लाभावा यासाठी मी तिच्या खोलीत झोपायची,' असं तनिषाने म्हटलं आहे. 

त्यानंतर तनीषाने म्हटलं आहे की, 'आई जे आपल्या मुलांसाठी करु शकते ते दुसरं कोणी करु शकत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की मुलांसाठी एका महिलेला घरात थांबणे आवश्यक आहे. एक आईच मुलाला शिकवू शकते. फक्त आईच हे करु शकते. हे तुम्हाला शाळा, नॅनी किंवा मेड नाही करु शकत.'