GBS रुग्णांची संख्या वाढत असतानाच पुण्यातून दिलासादायक बातमी, 6 वर्षांचा चिमुकला...

Pune GBS News Today: पिंपरी चिंचवडमधून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एका 6 वर्षांच्या मुलाने जीबीएसवर मात केली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 2, 2025, 01:37 PM IST
GBS रुग्णांची संख्या वाढत असतानाच पुण्यातून दिलासादायक बातमी, 6 वर्षांचा चिमुकला...  title=
pimpri chinchwad six year year old boy recover from gbs in pune

Pune GBS News Today: महाराष्ट्रात सध्या गिया बॅरे रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. तर, आत्तापर्यंत चार जणांनी जीबीएसमुळं प्राण गमावले आहेत. गिया बॅरे सिंड्रोमच्या नकारात्मक बातम्या येत असताना पिंपरी चिंचवडमधून एक दिलासादायक बातमी आली आहे. एका सहा वर्षांच्या चिमुरड्याने जीबीएसवर यशस्वीपणे मात केली आहे. 

पुण्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराचे रुग्ण वाढत आहे. पुण्यासोबतच सातारा जिल्ह्यातही जीबीएसचे चार रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच पिंपरीतून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. इथल्या सहा वर्षीय चिमुरड्याने जीबीएस वर मात केलीये. व्हेंटिलेटर, आयसीयू अन मग जनरल वॉर्ड असे चौदा दिवसांचे उपचार घेऊन तो आता ठणठणीत बरा झाला आहे.

सहा वर्षांच्या मुलाने जीबीएसवर मात केल्यानंतर आता त्याला घरीदेखील सोडण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर फिजिओथेरपीचे उपचार सुरू आहेत. पण लवकरच तो या उपचारांमुळं ठणठणीत बरा होईल, अशी आशा त्यांच्या कुटुंबीयांना आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बाहेरचं खाल्ल्यानंतर कुटुंबियांतील सर्वांनाच जुलाब झाले पण नंतर सगळे बरे झाले. आठवड्यानंतर या चिमुरड्याचे हात अन् पाय दुखू लागले. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेण्यात आली, त्यावेळी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सल्ल्याचं तंतोतंत पालन केल्यानं आज त्यांचा मुलगा जीबीएसवर मात करुन घरी परतला आहे. 

दरम्यान, पुण्यामध्ये जीबीएस म्हणजेच गीया बार्ये आजाराचा चौथा बळी गेला आहे. गीया बार्येचा वेगानं होत असलेला प्रसार चिंतेचा विषय बनला आहे. अचानकपणे उद्भवलेल्या या आजाराची रुग्णसंख्या 130 वर पोहोचली असून नागरिकांनी संसर्ग टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. पुण्यातील डीएसके विश्व परिसरात राहणाऱ्या प्रवीण विभुते या 40 वर्षीय तरुणाचा 25 जानेवारी रोजी मृत्यू झाला आहे. 

लातूरकरांसाठी दिलासादायक बातमी

ातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचाराखाली असलेल्या त्या दोन्ही रुग्णांच्या स्टूल सॅम्पलचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना जीबीएस नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता लातूरकरांना दिलासा मिळाला आहे. प्रथमदर्शनी ते दोन रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर  उपचाराखाली असलेल्या या रुग्णांना जीबीएसचा संसर्ग झाल्याचा संशय होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घराच्या परिसरात सर्व्हेक्षणही करण्यात आले होते. तथापि, चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने हा संशय दूर झाला असल्याचे तसेच या दोन्ही रुग्णांची प्रकृती चांगली असल्याची माहिती प्रशासनाने दिली