'पँटी इतकी छोटी हवी की...,' दिग्दर्शकाची 'ती' मागणी ऐकून प्रियंका चोप्रा हादरली, म्हणाली 'मी आयुष्यात पुन्हा...'

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) नुकतंच एका दिग्दर्शकासोबत आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. त्यावेळी ती 19 वर्षांची होती आणि चित्रपट सोडून बाहेर पडली होती.   

शिवराज यादव | Updated: Feb 2, 2025, 02:00 PM IST
'पँटी इतकी छोटी हवी की...,' दिग्दर्शकाची 'ती' मागणी ऐकून प्रियंका चोप्रा हादरली, म्हणाली 'मी आयुष्यात पुन्हा...' title=

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडताना ती मागे पुढे पाहत नाही. तिने अनेकदा आपला संघर्ष सांगितलं आहे. तसंच आपल्या बॉलिवूड प्रवासात आलेले कास्टिंग काऊच आणि इतर अनुभवही तिने जाहीरपणे सांगितले आहेत. नुकतंच तिने एका कार्यक्रमात बॉलिवूड दिग्दर्शकासोबत आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. त्यावेळी प्रियांका चोप्रा 19 वर्षांची होती. या घटनेने ती इतकी दुखावली होती की, तिने चित्रपट सोडला होता. 

Forbes Power Women’s Summit मध्ये प्रियांका चोप्राने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात घडलेली एक घटना सांगितली. वयाच्या 19 व्या वर्षी एका चित्रपटात काम करत असताना तिने दिग्दर्शकाशी संवाद साधला होता. यावेळी तिने या भूमिकेसाठी नेमके कसे कॉस्ट्यूम लागणार आहेत, तसंच स्क्रीनवर कसं दिसणं अपेक्षित आहे यासंदर्भात आपल्या स्टायलिस्टसह बोलण्याची विनंती केली होती. 

तिने सांगितलं की, "त्यांनी फोन उचलला आणि म्हणाले की, ती जेव्हा पँटी दाखवेल तेव्हा लोक येऊन तिच्यासाठी चित्रपट पाहणार आहेत. त्यामुळे ती फार छोटी असायला हवी. मलाही ती पँटी दिसायला हवी. तुला माहितीये ना जे लोक पुढे बसलेले असतील? त्यांना ती पँटी दिसायला हवी. त्यांनी चार वेळा ही एक गोष्ट सांगितली".

प्रियांका चोप्राने घरी आल्यानंतर आपली आई मधू चोप्रा यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. आपण त्या दिग्दर्शकाच्या चेहऱ्याकडेही पाहू शकत नव्हतो असं तिने आईला म्हटलं. तिने आईला सांगितलं की "जर ते माझ्या असा विचार करत असतील, त्यांच्या मते मी इतकी छोटी असेल तर मग प्रगती करण्यासाठी काही जागाच नाही". या प्रकारानंतर प्रियांका चोप्राने चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला आणि नंतर  कधीच त्या दिग्दर्शकासह काम केलं नाही. 

दरम्यान कामाबद्दल बोलायचं गेल्यास प्रियांका चोप्राने नुकतंच 'सिटाडेल सीझन 2'चं शूटिंग पूर्ण केलं आहे, याशिवाय The Bluff आणि Heads of State यांचं शूटिंग सुरु आहे. याशिवाय एस एस राजामौली यांच्या एका चित्रपटात ती महेश बाबू आणि जॉन अब्राहम यांच्यासोबत झळकण्याची शक्यता आहे.