Mangalprabhat Lodha : व्यवसायात आघाडीवर असणारा जैन समाज राजकारणात फारसा सक्रिय दिसत नाही. महाराष्ट्रात या समाजाचे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकचे प्रतिनिधी आहेत. सरकारमध्ये जैन समाजाचं प्रतिनिधीत्व नसल्याची खंत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली आहे. मंगलप्रभात लोढा हे महाराष्ट्रातील श्रीमंत आमदारांपैकी एक आहेत.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे जैन समाजाला सरकारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहेत. 1952 मध्ये जैन समाजाचे 57 खासदार होते. आता ही संख्या शून्यवर आली असल्यानं जैन समाजानं जास्तीत जास्त सरकारी कामांमध्ये सहयोग देत सरकारमध्ये आपला सहभाग दाखवावा असे अवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी समाजाला केले आहे. वेळ बदलला आहे. जैन समाज म्हणून आपण सगळे एकत्र आलो पाहिजे. सगळ्यांनी समाज आणि सरकारसोबत एकत्र आले पाहिजे असे लोढा म्हणाले.
राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपालांच्या उपस्थितीत भगवान महावीर स्वामी निर्वाण कल्याणक समितीचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढांनी जैन समाजाला हे आवाहन केले.
मंगलप्रभात लोढा हे मुंबईतील मलबार हिलचे आमदार आहेत. मंगलप्रभात लोढा हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत मंगलप्रभात लोढा यांचे स्थान पहिल्या टॉप 5 मध्ये आहे. मंगलप्रभात लोढा यांची एकूण मालमत्ता 441 कोटी इतकी आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कुटुंबात संपत्तीवरुन वाद झाला. लोढांच्या दोन्ही मुलांमध्ये व्यावसायिक कारणांवरून मोठा वाद झाला.
मोठा मुलगा अभिषेक लोढा यांची लहान मुलगा अभिनंदन विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 5 हजार कोटींच्या नुकसानभरपाईचीही भावाकडून मागणी करण्यात आली. उद्योगामध्ये लोढा हे नाव आणि व्यापार चिन्हाच्या वापरावरून भावांमध्ये टोकाचा वाद झाला.