Maharahstra Kesari Kusti 2025 : राज्यसह देशभरातील कुस्तीप्रेमींचे आकर्षण असणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर येथे खेळवली जातं आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत महाराष्ट्र केसरी स्पर्धेतचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी महाराष्ट्र केसरी या खिताबासाठी स्पर्धेची अंतिम लढत पार पडणार आहे, मात्र त्यापूर्वी झालेल्या उपांत्य फेरीत पैलवान शिवराज राक्षेच्या पराभवानंतर स्पर्धेत गोंधळ निर्माण झाला.
अहिल्यानगर येथे होत असलेल्या महाराष्ट्र केसरी 2025 (Maharashtra Kesari) च्या गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात तर माती विभागातील अंतिम लढत सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात पार पडली. यात माती विभागातील अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडबने विजय मिळवला. तर गादी विभागातील अंतिम लढतीत पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ याने नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा पराभव केला. मात्र गादी विभागातील या पराभवानंतर पैलवान शिवराज राक्षे आक्रमक झाला आणि त्याने थेट पंचांना मारहाण केली.
गादी विभागात झालेल्या अंतिम लढतीत पृथ्वीराजकडून पराभव झाल्यावर पैलवान शिवराज राक्षे आक्रमक झाला. त्याने थेट पंचांशी वाद घातला. यावेळी शिवराजने पंचांची कॉलर पकडली आणि त्यांना लाथ मारली. सदर दृश्य कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाले. या वादानंतर काहीकाळ स्पर्धेत गोंधळ पाहायला मिळाला. पोलिसांनी मध्यस्थी करून शिवराज राक्षेला मैदानाबाहेर केले. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणली. आता मातीवर पृथ्वी मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात होणार महाराष्ट्र केसरीच्या खिताबासाठी अंतिम लढत होणार आहे.
पराभव आणि पंचांना केलेल्या मारहाणीवर शिवराज राक्षे याने प्रतिक्रिया दिली. गादी विभागातील अंतिम लढतीत माझी पाठ टेकली नव्हती तरी देखील पंचांनी निर्णय घोषित केला. पुन्हा एकदा व्हिडीओ पाहून सदर गोष्टीची शहानिशा करावी जर त्यात माझी पाठ टेकली असेल तर मी पराभव मान्य करीन आणि इथून निघून जाईन.
शिवराज राक्षे हा मूळचा राजगुरुनगरच्या राक्षेवाडीचा असून त्याला कुस्तीचं बाळकडून घरातच मिळालं होतं. वडील शेतकरी आहेत आणि घरचा दुधाचा व्यवसाय आहे. शिवराजचे वडील व आजोबा दोघे पैलवान होते. त्यांचाच वारसा शिवराज याने पुढे चालवत असून त्याने यापूर्वी महाराष्ट्र केसरीवर दोनदा नाव कोरलं आहे.