Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मानाची गदा कोण पटकवणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. उपांत्य फेरीत झालेल्या राडा आणि मारहाणीमुळे जेतेपदाबाबत सर्व जण उत्सुक होते. अखरे अंतिम फेरीत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळने बाजी मारलीय. साताऱ्याचा महेंद्र गायकवाडचा पराभव करत मोहोळ यांनी महाराष्ट्र केसरी गदावर आपलं नाव कोरलंय.
अहिल्यानगर इथल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महेंद्र गायकवाडने माती विभागातून अंतिम लढतीत दमदार एन्ट्री मारली. तर, पृथ्वीराज हा मॅट विभागातून अंतिम लढतीत धडक मारली. महेंद्र आणि पृथ्वीराज यांच्यामध्ये झालेल्या तुल्यबळ लढत कुस्ती चितपट न होता प्लॅईंट ही कुस्ती पृथ्वीराज मोहोळ यांनी जिंकत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची लढत पाहण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली होती.
अहिल्यानगर इथे झालेल्या महाराष्ट्र केसरी 2025 (Maharashtra Kesari) च्या गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली होती. तर माती विभागातील अंतिम लढत सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यामध्ये रंगली. या रोमांचित लढतीत माती विभागातील अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने तर गादी विभागातील अंतिम लढतीत पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ याने धडक मारली. पण यंदा महाराष्ट्र केसरी 2025 गालबोट लागलं. कारण नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा पराभव झाल्यानंतर पैलवान आक्रमक झाला आणि त्याने थेट पंचांना मारहाण केली. यावेळासाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तणावाचा वातावरण निर्माण झाले होतं. पोलिसांना या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला.
गादी विभागात झालेल्या अंतिम लढतीत पृथ्वीराजकडून पराभव झाल्यावर पैलवान शिवराज राक्षे आक्रमक झाला. त्याने थेट पंचांशी वाद घातला. यावेळी शिवराजने पंचांची कॉलर पकडली आणि त्यांना लाथ मारली. सदर दृश्य कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाले. या वादानंतर काहीकाळ स्पर्धेत गोंधळ पाहायला मिळाला. पोलिसांनी मध्यस्थी करून शिवराज राक्षेला मैदानाबाहेर केले. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणली. आता मातीवर पृथ्वी मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात होणार महाराष्ट्र केसरीच्या खिताबासाठी अंतिम लढत होणार आहे.