अंघोळ करताना प्रथम कोणत्या भागावर पाणी घ्यावे; प्रेमानंद महाराजांनी सांगितली स्नानाची शास्त्रीय पद्धत

प्रेमानंद महाराजांनी सांगितली स्नानाची शास्त्रीय पद्धत. जाणून घेऊया ही नेमकी कोणती पद्धत 

वनिता कांबळे | Updated: Feb 3, 2025, 12:05 AM IST
अंघोळ करताना प्रथम कोणत्या भागावर पाणी घ्यावे; प्रेमानंद महाराजांनी सांगितली स्नानाची शास्त्रीय पद्धत title=

Premanand Maharaj Bathing Rules : अंघोळ हे आपल्या रोजच्या दिनचर्येतील महत्वाचे काम आहे. अंघोळ केल्याने फक्त शरीरच स्वच्छ होत नाही तर मन देखील प्रसन्न होते. यामुळेच उत्तम शारीरीक आणि मानसिक स्वस्थ्यासाठी रोज अंघोळ करणे अत्यंत महत्वाचे आहे. मात्र, अंघोळ करताना आपण अनेक चुका करतो. या चुका आपल्या लक्षातही येत नाहीत.   आंघोळ करताना प्रथम कोणत्या भागावर पाणी घ्यावे हे अनेक लोकांना माहित नाही.  प्रेमानंद महाराजांनी स्नानाची शास्त्रीय पद्धत सांगितली आहे. जाणून घेऊया ही पद्धत.

प्रेमानंद महाराज यांच्या म्हणण्यानुसार अंघोळीसाठी नेहमी थंड पाण्याचाच वापर करावा. थंड पाण्याने अंघोळ केल्याने अनेक प्रकारच्या विकारांपासून आराम मिळतो.  आंघोळ करताना सर्व प्रथम नाभीत पाणी ओतले पाहिजे. यानंतर संपूर्ण शरीरावर पाणी ओतले पाहिजे. ब्रह्मचर्य पाळणाऱ्या लोकांनी अशा प्रकारे स्नान करणे योग्य मानले जाते असे प्रेमानंद महाराज सांगतात.

शास्त्रीयदृष्ट्या हा आंघोळीचा योग्य मार्ग मानला जातो असे प्रेमानंद महाराजांचे म्हणणे आहे. अंगावर साबण-सोडा वगैरे वापरण्याची गरज नाही. तेलामुळे शरीराला घाण चिकटते यामुळे रोज चिखलाने शरीर धुतले तर शरीर घाण होत नाही असे  प्रेमानंद महाराज सांगतात. जे लोक ब्रह्मचर्य पाळतात त्यांनी आपले केस रेठा किंवा अशा कोणत्याही नैसर्गिक आणि पवित्र वस्तूने धुवावेत असा सल्ला प्रेमानंद महाराज देतात.

शास्त्रानुसार स्नानाचे चार प्रकार आहेत. सूर्योदयापूर्वी ताऱ्यांच्या छायेत केलेल्या स्नानाला ऋषीस्नान म्हणतात. ब्रह्म मुहूर्तावर केलेल्या स्नानाला ब्रह्मस्नान म्हणतात. तीर्थक्षेत्रातील नद्यांमध्ये स्नानाला देवस्नान म्हणतात. सूर्योदयानंतर खाऊन पिऊन केलेल्या स्नानाला राक्षस स्नान म्हणतात. गृहस्थांसाठी ब्राह्ममुहूर्तावर स्नान करणे योग्य मानले जाते. असे केल्याने व्यक्ती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या स्वच्छ राहते.

आंघोळ करताना मंत्रांचा जप केल्याने केवळ मनच नाही तर शरीरही शुद्ध होते. आंघोळ करताना फक्त ओंकार (ओम) चा जप करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासोबत तू - ओम गंगे च यमुने चैवा गोदावरी सरस्वती. तुम्ही नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु या मंत्राचाही जप करू शकता असे प्रेमानंद महाराज सांगतात.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. )