चेन्नई : ऑनलाईन फोन विक्रीत फ्लिपकार्टने आघाडी घेतली आहे, मात्र याचा फायदा लिनोव्हाला देखिल मोठ्या प्रमाणात झाला आहे.
चीनी बनावटीच्या 'लिनोव्हा‘चे तब्बल एक लाख स्मार्टफोन्स केवळ पंधरा मिनिटांत विकले गेले आहेत. याबाबत लिनोव्हाने एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
‘फ्लिपकार्टच्या मदतीने सादर करण्यात आलेला ए 6000 प्लसचे एक लाख स्मार्टफोन्स् फिल्पकार्टच्या मदतीने विकले गेले आहेत.‘ अशी माहिती लिनोव्हाने दिली आहे.
फ्लिपकार्ट डॉट कॉमवर आज दुपारी दोन वाजता ए 6000 नावाचा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला.
या फोनची किंमत रुपये 7499 असून त्यामध्ये "फोर जी‘ची सुविधाही उपलब्ध आहे. या फोनला ड्युएल डॉल्बी पॉवरचे स्पिकर्स आहेत. दरम्यान याच स्मार्टफोनची पाच मे पासून फ्लिपकार्टद्वारे पुन्हा विक्री सुरू करण्यत येणार आहे.
यानिमित्ताने ऑनलाईन विक्रीमध्ये मोठी संधी असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.