मुंबई : जगात असे काही सत्य आहेत जे आपल्याला माहीत नसतात. असे काही क्रेझी सत्य आहेत ते आपल्या वाचून आश्चर्य वाटले आणि हसूही येईल.
१) बुद्धिबळात पहिल्या दहा चाली खेळण्यासाठी 169,518,829,100,544,000,000,000,000,000
पद्धती आहे. इतक्या पद्धतीने आपण पहिल्या दहा चाल खेळू शकतो.
२) अमेरिकेचे प्रसिद्ध पेय कोकाकोलाचे व्हर्जन क्लिअर कोला हे रशियामध्ये तयार झाले होते.
३) १९९१ मध्ये स्विडनमध्ये जन्माला आलेल्या मुलाचे नाव Brfxxccxxmnpcccclllmmnprxvclmnckssqlbb11116. असून त्याचे पालक याचा उच्चार 'अल्बिन' करतात. स्वीडनच्या नाव संदर्भातील कायद्याचा निषेध म्हणून पालकांनी आपल्या मुलाचं नाव इतकं मोठं ठेवलं होतं. त्या पालकांना १९९६ मध्ये ७५० डॉलरचा दंड लावण्यात आला होता.
४) डॉक्टरांच्या चुकीच्या हस्ताक्षरामुळे प्रत्येक वर्षी ७ हजार जणांना आपले प्राण गमवावे लागतात.
५) एप्रिल ४, जून ६, ऑक्टोबर १० आणि डिसेंबर १२ हे कोणत्याही वर्षाच्या आठवड्यातील एकाच वाराला येतात.
६) मार्लिन मेन्रो हिचा आयक्यू हा अल्बर्ट आयनस्टाइनपेक्षा अधिक होता. आइनस्टाइनचा आयक्यू १६० होता तर मर्लिनचा आयक्यू १६३ होता.
७) हिटलरला टाइम मॅगझीने मॅन ऑफ द इअर घोषीत केले होते. तसेच त्याचे नाव शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नॉमिनेट केले होते. १९३८ मध्ये त्याला मॅन ऑफ द इअर घोषीत केले तर १९३९ मध्ये नोबेलसाठी नॉमिनेट केले होते. पण १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले.
८) लासव्हेगासच्या कॅसिनोमध्ये कुठेचं घड्याळ नाहीत.
९) पुरूषाच्या बगलेतील घाम महिलांना रिलॅक्स करतो. त्यांचा मूड बुस्ट करतो. तसेच त्याचे पिरिअड सायकल सुरळीत करण्यात मदत करतो. त्यासाठी तो त्यांच्या ओठांना लावल्यास फायदा होता.
१०) नर पांढरा उंदीर हा आपल्या मादीसाठी गाण म्हणतो.