नवी दिल्ली : मुकेश अंबानीच्या रिलायंस जिओनंतर आता चीनची अलीबाबा कंपनी भारतात टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये मोठा धमाका करणार आहे. अलीबाबा भारतात फ्रीमध्ये इंटरनेट कनेक्शन देणार आहे. यावर काम सुरु झालं आहे. भारतात ही कंपनी यूसीवेब नावाच्या इंटरनेट सॉफ्टवेअर आणि सर्विस प्रोवाईडर आहे.
अलीबाबा मोबाईल बिझनेस के के ओवरसीज प्रेसीडेंट जँक हुआंगने एका न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं की, कंपनीचा विचार आहे की, यूजरला कमीत कमी किंमतीत चांगला डेटा कनेक्टिविटी मिळावी. सध्या ही कंपनी भारतीय टेलीकॉम कंपन्यांना मोफत इंटरनेट देण्यासाठी विचार करत आहे.
अलीबाबा पहली कंपनी नाही आहे ज्याने भारतात मोफत इंटरनेट देण्याची योजना केली आहे. याआधी फेसबूकने Internet.org आणि फ्री बेसिक्स प्रोजेक्टच्या माध्यमातून ही असं करण्याचा प्रयत्न केला आहे. मुकेश अंबानींची कंपनी रिलायंस जिओ मागील काही दिवसांपासून मोफट डेटा आणि कॉलिंग सेवा देत आहे. जिओचे ग्राहकांची संख्या 8 कोटींच्या घरात पोहोचणार आहे.