नवी दिल्ली : अॅपलच्या आयफोनसह आयपॅड, आयपॉडचं उत्पादन भारतात होण्याची शक्यता निर्माण आहे.
अॅपलसाठी फोन-टॅब बनवणाऱ्या फॉक्सकॉन टेक्लॉलॉजीनं याबाबत चाचपणी सुरू केली असून कंपनीनं महाराष्ट्रासह देशभरात ठिकाणांचा शोध सुरू केला आहे.
नजिकच्या भविष्यात कंपनीच्या अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ राज्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. याबाबत फॉक्सकॉन आणि अॅपलनं अद्याप आपली अधिकृत प्रतिक्रिया जाहीर केली नसल्याचं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं म्हटलंय.
देशात उत्पादन सुरू झाल्यास केंद्र सरकार, कंपनी आणि ग्राहकांसाठी विन-विन सिच्युएशन ठरणार आहे.. सध्या कंपनीचं उत्पादन हे प्रामुख्यानं चीनमध्ये होतं. मात्र तिथली मजुरी दिवसेंदिवस महाग होत असल्यामुळे कंपनीला भारतात येणं सोयीचं आहे.
देशांतर्गत उत्पादन झाल्यास ग्राहकांना स्वस्तात आयफोन-आयपॅड मिळू शकेल. तर केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया मोहीमेचं हे मोठं यश मानलं जाईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.