मुंबई: सध्या जगभरातील टेक्नोसॅव्ही मंडळीचं लक्ष लागलंय ते अॅपलच्या आयवॉचकडं... अॅपल पहिल्यांदाच स्मार्ट वॉच लाँच करतंय... त्यामुळं तमाम गॅझेटप्रेमींच्या डोक्यात सध्या हीच एक टिकटिक वाजतेय... आणि त्यांच्या काळजाची धडधडही वाढलीय...
- हे घड्याळ तुमचं बेस्ट फ्रेंड बनेल...
- आता स्वतःला फिट न ठेवण्यासाठी कामाचा बहाणा अजिबातच चालणार नाही...
- आता दिवसभर घाम गाळण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही
- प्रत्येक वेळी योग्य सल्ला देण्यासाठी लवकरच येतोय तुमचा बेस्ट फ्रेंड
हातातलं हे घड्याळ एकदम खासमखास आहे. अनेक अर्थांनी... याची सर्वात मोठी खासियत म्हणजे मोबाईल आणि गॅजेटच्या दुनियेत क्रांती घडवणाऱ्या अॅपल कंपनीचं हे पहिलंच स्मार्ट वॉच आहे..
अॅपलनं एखादं नवं प्रॉडक्ट लाँच करावं आणि त्याची जगात चर्चा होऊ नये, असं होऊच शकत नाही.
आता आम्ही सांगतो की, या घड्याळाची चर्चा अख्ख्या जगभरात का आहे? अॅपलचा दावा आहे की, आयवॉच वापरणारे आयुष्यभर हे घड्याळ आपल्यापासून वेगळं करूच शकत नाहीत.
हे स्मार्ट वॉच एवढं स्मार्ट आहे की, आपल्या दैनंदिन जीवनाच्या सेकंदासेकंदाचा हिशेब ते ठेवतं. हे तंत्रज्ञान एवढं प्रगत आहे की, त्यामुळं आपल्या तब्येतीची काळजी घेता येईल. या रिस्ट वॉचमध्ये अशी फिचर्स आहेत, की आपल्या सवयीनुसार ते आपल्याशी इंटरॅक्ट करतं...म्हणजे एखाद्या दिवशी तुम्ही कमी कॅलरीज बर्न केल्यात, तर हे आयवॉच तुम्हाला सांगेल की, आणखी मेहनत करण्याची गरज आहे.
दिवसभरात किती चाललात, किती सायकल चालवलीत, ऑफिसात एकाच पोझिशनमध्ये किती काळ काम केलंत, याची माहिती ते तुम्हाला देईल. या घड्याळाच्या मदतीनं तुम्ही मित्र-मैत्रिणींशी संपर्कात देखील राहू शकता... एकदम हटके स्टाइलनं...
तुमच्या एखाद्या मित्राला तुमच्या हृदयाची धडधड ऐकवायची असेल तर हे आयवॉच ती कमाल करू शकते... आयवॉच टॅप करून तुम्हाला तुमच्या मित्राचं लक्ष वेधायचं असेल तर मित्राच्या आयवॉचवरही तो आवाज ऐकू येईल...
नुसतं मनगट वर करायची खोटी, आयवॉचचं सेंसर्स लगेच अॅक्टिवेट होतील... त्यासोबत तुम्हाला खूप सारी अॅप्लिकेशन्स दिसतील. घड्याळातील डिजिटल क्राऊननं ते तुम्ही ऑपरेट करू शकता. या क्राऊनच्या मदतीनं तुम्ही नकाशे, फोटो, अॅप्लिकेशन झूम इन आणि झूम आऊट करू शकता. क्राऊनच्या खालचं बटन दाबलं की, डिस्प्लेवर तुमच्या मित्रांची लिस्ट दिसू लागेल. तुम्हाला पाहिजे त्याच्याशी तुम्ही संपर्क साधा... एकदम स्टाइल से...
एका सिंगल चीपमध्ये बसवण्यात आलेला हा कॉम्प्युटर म्हणजे तंत्रज्ञानाचा अनोखा आविष्कार आहे...
विविध रंगांमध्ये आणि मटेरियलमध्ये आयवॉच उपलब्ध आहे. ग्राहक आपल्या आवडीनुसार त्याची निवड करू शकतात. लवकरच आयवॉचचं अधिकृत लाँचिंग भारतात होणार असून, एप्रिलपर्यंत ते बाजारात उपलब्ध होणार आहे. आणि या जादुई आयवॉचची किंमत २१ ते २५ हजाराच्या घरात असणार आहे..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.