www.24taas.com, लंडन
आत्तापर्यंत एकदातरी तुम्ही फेसबुकवर दिवसातला वेळ वाया घालवता याचं आकलन करून पाहिलंच असेल. नसेल तर नक्की करून पाहा… कारण आता फेसबुक आणि त्यामध्ये आपल्या फ्रेंडलिस्टमध्ये सहभागी असणारे फ्रेंडस् हेही तणावाचं एक कारण असू शकतं, असं एका संशोधनातून स्पष्ट झालंय.
फेसबुकवर जास्तीत जास्त मित्र अॅड करणं, यासाठी तरुणांमध्ये जणू काही एकप्रकारे स्पर्धाच सुरू आहे. हे एक स्टाईल स्टेटमेंटही बनत चाललंय. ‘इडेनबर्ग बिझनेस स्कूल युनिव्हर्सिटी’च्या एका रिपोर्टनुसार तुम्ही जेवढे मित्र तुमच्या फेसबूकवर अॅड करता तेवढाच तुमच्या डोक्यचा तापही वाढत जातो. त्यामुळे आक्रमकतेतही तितकीच वाढ होत जाते. फेसबूकवर जेवढे जास्त मित्र तेवढीच एखाद्याची अपमान होण्याच्या शक्यतेत वाढ होते. विशेष म्हणजे जेव्हा आई-वडिलांना फ्रेंडलिस्टमध्ये अॅड करणारी मुलं सतत धास्तीत राहतात. मित्रांना नावडत्या गोष्टी करण्यातही तरुणांना आणखीनच मजा वाटते.
वेगवेगळ्या वयांतील लोक या वेबसाईटशी जोडले गेले आहेत. त्यांची प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. अशावेळी, वयस्कर लोकांची तरुण मुलांपेक्षा मतं नक्कीच भिन्न ठरतात. रिपोर्टनुसार, अनेकजण फेसबूकवर आपल्या सध्याच्या साथीदारापेक्षा भूतकाळातील साथीदारावर जास्त लक्ष ठेवतात. या सर्वेक्षणासाठी ३०० लोकांचा अभ्यास केला गेला. यामध्ये मुख्यत्वेकरून २१ वर्षांच्या मुलांचा मोठा सहभाग होता.