मुंबई : देशातील तीसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आयडियाने सेल्युलरने 3जी आणि ४ जी च्या नाईट डेटा पॅकच्या किंमतीत ५० टक्क्यांनी कमी केल्या आहेत. आयडिया युजर्स आता १ जीबी नाईट डेटा प्लान फक्त १२५ रुपयात मिळवू शकता. डे आणि नाईटसाठी ट्विन डेटा पॅक देखील कंपनीने लॉन्च केला आहे. यामध्ये युजर्सला ३० टक्के सूट मिळणार आहे. ५०० एमबी(250एमबी डे आणि 250 एमबी नाईट) फक्त ११५ रुपयात दिला जाणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही ४० जीबी पर्यंतचा प्लॅन घेऊ शकता.
ग्राहकांना इंटरनेट वापराचा अधिक आनंद घेता यावा यासाठी या प्लान आणला असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. ३ जी आणि ४ जी या दोन्हीमध्ये हे प्लान उपलब्ध आहेत. याआधी एअरटेलने ही इंटरनेट प्लानच्या किंमती कमी केल्या होत्या.
एअरटेलने मागील आठवड्यात डबल डेटा देत प्रीपेड डेटा पॅक लॉन्च केला होता. यामुळे ग्राहकांना ३० टक्के फायदा होणार आहे. 259 रुपयात प्रीपेड डेटा पॅक मध्ये 1 जीबी 3जी आणि 4जी डेटा 28 दिवसांसाठी दिला जाणार आहे. तर 296 रुपयात डबल डेटा पॅक म्हणजेच 2 जीबी डेटा म्हणजेच 1जीबी प्रत्येकी 3जी आणि 4 जीसाठी दिला जाणार आहे. रात्रीच्या वेळेत १ जीबी अतिरिक्त डेटा दिला जाणार आहे.