मुंबई: प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी लिनोव्होनं आपला पॉप्युलर स्मार्टफोन A6000ला पुन्हा एकदा नव्या रुपात लॉन्च केलंय. लिनोव्होचा नवा स्मार्टफोन A6000 प्लसची किंमत केवळ ७४९९ रुपये आहे. शुक्रवारी लॉन्च झालेल्या या फोनची पहिली ऑनलाइन विक्री २८ एप्रिलपासून फ्लिपकार्टद्वारे सुरू होईल.
ड्युअल सिम सपोर्ट असलेला लिनोव्हो A6000 प्लसचे अनेक फीचर्स A6000 सारखे आहेत. मात्र याची रॅम आणि इनबिल्ट स्टोरेज जास्त आहे. यात २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी आहे. तर A6000मध्ये १ जीबी रॅम आणि ८जीबी इंटरनल मेमरी आहे.
Lenovo A6000 Plus चे फीचर्स -
डिस्प्ले: 5" (720x1280 pixels)
ओएस: अँड्रॉइड 4.4.4 (किटकॅट)
चिपसेट: Qualcomm MSM8916 Snapdragon 410
प्रोसेसर: Quad-core 1.2 GHz
मेमरी: 16 GB इंटरनल
रॅम: 2 GB
कॅमरा: 8 MP रिअर, ऑटो फ्लॅश, 2 MP फ्रंट
बॅटरी: 2300 mAh
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.