नवी दिल्ली : जगातील टॉप कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टनं आज आपलं नवं ऑपरेटिंग सिस्टम 'विंडोज १०' जागतिक स्तरावर लॉन्च केलंय.
आजपासून तुम्ही हे नवीन ऑपरेटिंग सिस्टम डाऊनलोड करू शकता. या नव्या व्हर्जनकडून मायक्रोसॉफ्टला मोठी आशा आहे. यापूर्वी कंपनीनं आपल्या या नव्या व्हर्जनचा प्रीव्ह्यू व्हर्जन लॉन्च करून टेस्टिंगही केलीय.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात 'विंडोज १०' आपल्या नावाच्या घोषणेनंतर चर्चेत आलं होतं. यानंतर हे लॉन्च होण्याची अनेक जण वाट पाहत होते. 'विंडोज १०' आत्तापर्यंतच्या सगळ्या विंडोज व्हर्जनपेक्षा फास्ट, सुरक्षित आणि वापरायला सोप्पं असणार आहे.
ज्या यूजर्सकडे विंडोज ७ ऑपरेटिंग सिस्टम असेल किंवा आऊटलूक आणि लाईव्हसोबत त्याचं लाईव्ह अकाऊंट असेल ते 'विंडोज १०' हे व्हर्जन अपग्रेड करू शकतील. मुख्य म्हणजे हे ऑपरेटिंग सिस्टम फ्री अपग्रेड होणार आहे.
याची आखणी एक खासियत म्हणजे यामध्ये स्टार्ट बटन दिलं गेलंय... स्टार्ट बटन 'विंडोज ८'मधून हटवण्यात आलं होतं. याशिवाय, 'विंडोज १०'मध्ये अनेक आकर्षक फिचर्सही देण्यात आलेत.
विंडोज आत्ताही मायक्रोसॉफ्टच्या व्यापाराचा मुख्य भाग आहे. याशिवाय, सध्या या ऑपरेटिंग सिस्टमचे जवळपास १.५ अरब यूजर्स आहेत. परंतु, टेक रिसर्च फर्म असलेल्या 'गार्टनर'नं दिलेल्या माहितीनुसार, बाजारात स्मार्टफोन आणि टॅबलेट दाखल झाल्यानंतर विंडोज आत्ता जगातील केवळ १४ टक्के कम्प्युटर डिव्हाईसमध्ये अॅक्टिव्ह आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.