मुंबई : तुम्हाला यापुढे रस्त्यावर टेलिफोन रिसिव्हरवर बोलतांना दिसलं तर दचकू नका, कारण आता टेलिफोन रिसिव्हरसारखा दिसणारा अॅण्टी रेडिएशन रिसिव्हर सध्या लोकप्रिय होतोय.
सतत फोनवर बोलणाऱ्यांसाठी हा दिलासा म्हणता येईल, कारण मोबाईलने थेट जास्त वेळ बोलल्याने डोकेदुखी आणि तणाव जाणवतो, मात्र असा रिसिव्हर लावल्याने आवाजही व्यवस्थित ऐकू येतो. तसेच डोकेदुखी आणि रेडिएशनपासून सुटका मिळते, असं बोललं जातंय.
दिवसेंदिवस मोबाईल फोन लहान आणि हलका होत जात असतांना असा रिसिव्हर वापरण्यचा ट्रेंड वाढलाय, हे विशेष.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.