मुंबई: मोटोरोलानं मोटो एक्स प्ले भारतात लॉन्च केलाय. हा मोटोरोला एक्स सीरिजचा भारतातील तिसरा स्मार्टफोन आहे. जो अवघ्या १८,४९९ रुपयांत उपलब्ध होईल. मोटोरोलाची X सीरिज टचलेस कंट्रोल आणि चांगल्या परफॉर्मन्समुळे ग्राहकांमध्ये खूप पसंत केल्या गेली.
मोटोरोलानं नव्या मोटो एक्सला बॅटरी बॅकअपच्या मुद्द्यानं महत्त्वाचा स्मार्टफोन असल्याचा दावा केलाय. या स्मार्टफोनमध्ये ३६३०mAhची बॅटरी आहे, जी ३० तासांपर्यंत बॅकअप देईल. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे याचा २१ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. कॅमेऱ्याचं अॅपर्चर f/2.0 आहे. फोनमध्ये (1920x1080)फुल्ल एचडी एमोलेड डिस्प्ले आहे. मोटोरोलानं आपल्या मागील मोटो Xमध्ये पण एमोलेड डिस्प्ले दिला होता. जो की खूप दमदार बॅटरी देते.
आणखी वाचा - व्हिडिओ: असे ओळखा FAKE आणि ORIGINAL Samsungचे पार्ट्स
हा स्मार्टफोन २जीबी रॅमसोबत उपलब्ध असेल ज्याला १६जीबी आणि ३२जीबीचे वॅरिएंटमध्ये विकत घेऊ शकता. मोटोरोलानं या फोनमध्ये मायक्रो एसडी कार्ड स्लॉट पण दिला जाईल, जो १२८ जीबीपर्यंत सपोर्ट करेल.
पहिले सारखं यावेळी पुन्हा मोटोरोलानं आपला फोन फक्त फ्लिपकार्टवर विकण्याचा निर्णय घेतलाय. फोनची विक्री उद्यापासून सुरू होईल.
जाणून घ्या फीचर्स -
आणखी वाचा - कसं केलं जातं तुमचं फेसबुक अकाऊंट हॅक?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.