सॅन फ्रान्सिस्को : स्वयंचलित पद्धतीनं चालणारी एक कार परिक्षणासाठी तयार आहे... ‘गूगल’नं ही कार तयार केलीय.
इंटरनेट क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या ‘गूगल’नं सेल्फ ड्रायव्हिंग कार बनवण्यात यश मिळवलंय. या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या टीमनं आपलं हे यश सोशल नेटवर्किंग साईटवर आपल्या ग्राहकांशी शेअर केलंय. येत्या काही दिवसांत या कारचं परीक्षण पार पडेल आणि नवीन वर्षात उत्तर कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर ही कार पाहायला मिळेल, अशी आशा या टीमनं व्यक्त केलीय.
बिना स्टिअरिंग ही कार स्वयंचलित पद्धतीनं रस्त्यावर दिसेल. गूगलच्या क्रिस उर्मसननं मे महिन्यात लिहिलेल्या एका ब्लॉगमध्ये केलेल्या उल्लेखानुसार, या कारमध्ये स्टिअरिंग व्हिल, एक्सलेटर, पेडल किंवा ब्रेक पेडल दिसणार नाही... कारण, या कारमध्ये या सर्व गोष्टींची काहीही गरज नाही. आमचं सॉफ्टवेर आणि सेन्सरच ही सर्व कामं हाताळतील.
लग्जरी म्हणून नव्हे तर सामान्य व्यक्तीसाठी बॅटरीवर चालणाऱ्या आणि जास्तीत जास्त २५ मील (४० किलोमीटर) प्रति तास चालणारी कार बनविण्याचं ध्येय गूगलनं ही गाडी बनविताना डोळ्यांसमोर ठेवलं होतं... हे आता पूर्ण झालंय.
दरम्यान, या कारच्या तांत्रिक गोष्टींचा मात्र अद्यापही खुलासा करण्यात आलेला नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.