सॅन फ्रॅन्सिस्को : ‘हे सिरी, गिव्ह अस अ हिंट’ या अॅपलच्या वाक्याची उत्सुकता काल संपली. अॅपलने आपले दोन मोबाईल लॉन्च केलेत. तसेच त्यापुढे जाऊन नविन पिढीसाठी आमचे टीव्ही संच असतील असे अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी म्हटलेय. अॅपलने मोबाईलबरोबर आपला टीव्ही आणलाय.
अॅपलने आयफोन ६ एस आणि अॅपल टीव्ही बाजारात दाखल केला. याचबरोबर अॅपलची व्हाइस कमांड प्रणाली ‘सिरी’ ही अद्ययावत केली. अॅपल टीव्हीत ६० ओएस पेड अॅप स्ट्रिमिंग, अत्याधुनिक हार्डवेअर, टचपॅड रिमोट आणि सिरी आदी सुविधा असणार आहेत.
त्याआधी अॅपल वॉचही लॉन्च केले होते. आता अॅपलने घड्याळाची सुधारीत आवृत्ती बाजारात आणली आहे. यामध्ये फेसबुक मेसेंजरपासून ते आरोग्यविषयक अॅप्सचा समावेश आहे. मोबाईलच्या जगात प्रसिद्ध असलेली कंपनी अॅपलनं मंगळवारी मध्यरात्री आपला नवा स्मार्टफोन ६S आणि ६S प्लस लॉन्च केलाय. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी हा फोन लॉन्च केला.
आयफोन ६एस सिल्व्हर, गोल्ड, स्पाइस ग्रे आणि रोज गोल्ड रंगांमध्ये उपलब्ध असेल. आयफोनचं हे नवं मॉडेल आपल्या आधीच्या स्मार्टफोन पेक्षा थोडा पातळ आणि जड आहे. आयफोन ६S आणि ६S प्लसच्या लाइव्ह फोटो फिचरमध्ये आपण थ्री डी टच वापरू शकता. नवीन आयफोनमध्ये एक नवा फेसटाइम कॅमेरा सुद्धा आहे. ५ मेगापिक्सेल फ्रँट कॅमेरा देण्यात आलाय. नव्या आयफोनमध्ये १२ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.