नवी दिल्ली : फिलिप्स मोबाईलने आज वरिष्ठ नागरिकांसाठी एक नवा मोबाईल हँडसेट लॉन्च केला आहे.
यात अक्षरांचा मोठा आहे तसेच बॅटरी अधिक काळ चालते. या फोनची किंमत केवळ ३८०० रुपये आहे.
फिलिप्स कंपनीकडून देण्यात निवेदनात म्हटले आहे की, बाजारात उपल्बध असलेल्या फोनच्या अक्षरांचा छोटा आकार, कमी वेळ चालणारी बॅटरी यामुळे वरिष्ठ नागरिकांना अनेक अडचणींना समोरे जावे लागते.
प्यू रिसर्च इंटरनेट ग्रुपनुसार नव्या तंत्रज्ञानाला स्वीकारण्यास वरिष्ठ नागरिकांना खूप अडचणी येतात. या नव्या फोनची स्क्रिन २.४ इंचाची असून मोठ्या आकाराचे अक्षर तसेच कि पॅडही मोठ्या आकाराचा आहे. त्यामुळे त्यांना सोईस्कर होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.