मुंबई : फ्री डेटा आणि फ्री कॉलिंग देणाऱ्या रिलायन्स जिओमुळे अनेक प्रतिस्पर्धी कंपन्यांचं धाबं दणाणलं असतानाच रिलायन्स जिओ आता 4G फोनही घेऊन येत आहे. या फोनची किंमत फक्त 999 ते 1499 रुपये एवढी असल्याचं बोललं जात आहे. रिलायन्सच्या या नव्या फोनचे काही फोटोही लिक झाले आहेत.
जिओच्या या फोनमध्ये कीपॅडवर MyJio, JioTV, JioCinema आणि JioMusic apps ही विशेष बटण देण्यात आली आहेत. रिलायन्सनं हा फोन फक्त जिओ ग्राहकांसाठीच बनवला आहे.
मार्केटमध्ये मिळणाऱ्या अन्य कीपॅड असलेल्या फोनसारखाच हा फोन आहे. जिओ सर्विसच्या शॉर्टकट बटणांसोबतच या फोनला एलईडी टॉर्चही देण्यात आली आहे. या फोनची आणखी फिर्चस कंपनीनं सांगितली नसली तरी VoLTE कॉलिंग सुरु करण्यासाठी फोनमध्ये स्प्रेडट्रम चिप्स लावणं आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे. यासाठी जिओ चिप बनवणारी कंपनी क्वॉलकॉम आणि मीडियाटेकबरोबर चर्चा करत आहे.
याबरोबरच जिओच्या या फोनमध्ये रियर आणि फ्रंट कॅमेराही असणार आहे. हा कॅमेरा किती मेगापिक्सलचा असेल याबाबत मात्र अजून कंपनीनं कोणताही खुलासा केला नाही.