खूशखबर! रिलायन्स जीयोची स्मार्टफोन युजर्ससाठी धमाकेदार ऑफर

मुकेश अंबानीची कंपनी रिलायन्स जियो कंपनी एक धमाकेदार ऑफर देण्याच्या तयारीत आहे. १०००० रुपयांवरील सर्व महागड्या स्‍मार्टफोनवर रिलायन्स जियोचं फ्री सिम कार्ड मिळणार आहे. ही ऑफर एका आठवड्यासाठीच असणार आहे. सिमकार्डसोबत कस्‍टमर्सला ३ महिने रिलायन्स जियोची फ्री सर्विस दिली जाणार आहे. रिलायन्सने अजून याची अधिकृत घोषणा केलेली नाही. ही ऑफर रिलायन्स डिजिटलच्या स्‍टोरमधून स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर मिळणार आहे.

Updated: Aug 14, 2016, 12:29 PM IST
खूशखबर! रिलायन्स जीयोची स्मार्टफोन युजर्ससाठी धमाकेदार ऑफर title=

मुंबई : मुकेश अंबानीची कंपनी रिलायन्स जियो कंपनी एक धमाकेदार ऑफर देण्याच्या तयारीत आहे. १०००० रुपयांवरील सर्व महागड्या स्‍मार्टफोनवर रिलायन्स जियोचं फ्री सिम कार्ड मिळणार आहे. ही ऑफर एका आठवड्यासाठीच असणार आहे. सिमकार्डसोबत कस्‍टमर्सला ३ महिने रिलायन्स जियोची फ्री सर्विस दिली जाणार आहे. रिलायन्सने अजून याची अधिकृत घोषणा केलेली नाही. ही ऑफर रिलायन्स डिजिटलच्या स्‍टोरमधून स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर मिळणार आहे.

रिलायन्स जियोने सॅमसंगसोबत करार केला आहे. रिलायन्स १५ ऑगस्‍ट पासून 4जी सर्विस सुरु करणार आहे. तीन महिने फ्री डेटा आणि फोन कॉल्सचा फायदा घेता यावा म्हणून कंपनी प्रयत्न करतेय. सर्वात स्वस्त इंटरनेट सेवा देणारी रिलायन्स जीयो सर्वात पुढे आहे.

ड्युअल सिमकार्ड स्मार्टफोनवर रिलायन्स जियो अधिक लक्ष केंद्रीत करणार आहे.