गूगलचे सुचवले तुमच्या फोनसाठी 'प्रेमाचे दोन शब्द'

जर तुम्ही अॅन्ड्रॉईड लॉलीपॉप असलेला स्मार्टफोन किंवा टॅबलेट वापरत असाल तर तुमचा फोन 'ओके गूगल' बोलल्यावर लगेच अनलॉक होणार आहे. गूगलने आपला 'ट्रस्टेड व्हॉईस स्मार्ट लॉक' फिचर लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या फोन्ससाठी उपलब्ध केले आहे. गूगल स्मार्ट लॉक फिचरमुळे फोनला पॅटर्न अथवा पासवर्डद्वारे लॉक करण्याची गरज भासणार नाही. 

Updated: Apr 16, 2015, 05:35 PM IST
 गूगलचे सुचवले तुमच्या फोनसाठी 'प्रेमाचे दोन शब्द' title=

 

 

नवी दिल्ली : जर तुम्ही अॅन्ड्रॉईड लॉलीपॉप असलेला स्मार्टफोन किंवा टॅबलेट वापरत असाल तर तुमचा फोन 'ओके गूगल' बोलल्यावर लगेच अनलॉक होणार आहे.

गूगलने आपला 'ट्रस्टेड व्हॉईस स्मार्ट लॉक' फिचर लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या फोन्ससाठी उपलब्ध केले आहे. गूगल स्मार्ट लॉक फीचरमुळे फोनला पॅटर्न अथवा पासवर्डद्वारे लॉक करण्याची गरज भासणार नाही.

कसं सुरू करणार हे फीचर?
अॅन्ड्रॉईड लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या फोन्समध्ये गूगलचं हे 'ट्रस्टेड व्हॉईस लॉक' फीचर फोनच्या सेटिंगमध्ये देण्यात आलं आहे. तेथून त्याला ऑन केल्यानंतर हे फिचर सुरू होईल. फोनला लॉक करण्यासाठी यूजरला आपल्या आवाजात 'ओके गूगल' बोलावे लागणार आहे.

आपला आवाज या हे फीचर सेव्ह करून घेतं. त्यानंतर पुन्हा अनलॉक करण्यासाठी यूजरला पुन्हा 'ओके गूगल' बोलावे लागणार आहे. आवाज ओळखल्यानंतर तुमचा फोन अनलॉक होणार आहे.

काय आहेत तोटे?
हे लॉक फीचर जेवढं आकर्षक आहे, तेवढेच त्यात तोटे आहेत, असं स्वत: गूगलने स्पष्ट केले आहे. हे फीचर आवाज ओळखून काम करतं, हाच मोठा तोटा आहे.

कारण त्यामुळे दुसरी कोणतीही व्यक्ती जिचा आवाज तुमच्या आवाजाशी मिळता-जूळता असेल, ती व्यक्ती तुमचा फोन अनलॉक करू शकते. याशिवाय तुमचा आवाज रेकॉर्ड करूनही दुसरी व्यक्ती तुमचा फोन अनलॉक करू शकते.