नवी दिल्ली : अनेकदा चुकून आपल्याकडून एखाद्या व्यक्तीला मेसेज पाठवले जातात. यामुळे अनेकदा समस्या निमार्ण होऊ शकते. मात्र असेही अॅप आहेत जे अशा मेसेजेसना आपोआप डिलीट करतील.
काबूम नावाचे हे अॅप असून ते अँड्रॉईड आणि आयफोन दोन्हींमध्ये उपलब्ध आहे. या अॅपच्या सहाय्याने तुम्हाला हवा असलेला मेसेज आपोआप डिलीट होणार. या अॅपद्वारे मेसेज पाठवताना तुम्हाला विशिष्ट वेळ निर्धारित करावी लागेल. किती वेळ हा मेसेज पाठवलेल्या व्यक्तीला दिसला पाहिजे आणि किती वेळानंतर डिलीट झाला पाहिजे हे तुम्ही ठरवू शकता.
जर तुम्ही सोशल मीडियावर या अॅपद्वारे मेसेज पाठवात आहात तर मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तींची संख्याही तुम्ही ठरवू शकता. तुम्हाला एखादा मेसेज १० लोकांना पाठवायचा आहे तर त्या १० लोकांकडे मेसेज गेल्यावर तो आपोआप डिलीट होईल. याचप्रकारे विकर हे अॅप काम करते