नवी दिल्ली : प्रेमात असलेले प्रत्येक जोडपे आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. मात्र अनेकदा असे होते की आपण काय करत आहोत हे आपल्याच लक्षात राहत नाही. त्याचे परिणाम काय होतील यावर आपले लक्षच नसते. अशामध्ये एखादी चूक चांगलीच महागात पडू शकते. जर आपल्या जोडीदाराला कोणत्या गोष्टी आवडत नाही, कोणत्या गोष्टीने त्याला वाईट वाटते हे जर जाणून घेतले तर तुमच्या नात्यात वितुष्ट येणार नाही.
स्पष्ट बोला
तुमचे बोलणे किती स्पष्ट आहे यावर तुमचे व्यक्तिमत्व कसे आहे हे ठरवले जाते. जे काही बोलणार आहात ते स्पष्ट बोला. तुम्ही जर तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या नाहीत तर त्या समोरच्यापर्यंत पोहोचणार कशा?. तुमचे बोलणे स्पष्ट नसेल तर एकाच भेटीत समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलणं बंद करेल.
भावनांवर नियंत्रण राखण्यास शिका
कोणत्याही गोष्टीवर ओव्हररिअॅक्ट होण्याची तुमची सवयीने जोडीदाराला वाईट वाटू शकते. तुम्ही कोणाशीही बोलत आहात तर त्या व्यक्तीचे बोलणे आधी ऐकून घ्या आणि नंतरच प्रतिक्रिया द्या. ऐकूण घेण्याआधीच प्रतिक्रिया देणे कदाचित तुमच्या जोडीदाराला आवडणार नाही.
सतत एकटक पाहत राहू नका
तुम्ही तुमच्या जोडीदाराला पसंत करता ही गोष्टी जरी खरी असली तरी जोडीदार समोर आल्यानंतर सतत एकटक पाहत राहू नका. यामुळे तुमची इमेज चांगली बनणार नाही. समोरच्या व्यक्तीसोबत मैत्रीसारखा व्यवहार करणे तुमच्या हिताचे ठरेल.