नाशिक: सध्या नाशिकमध्ये जोरदार चर्चा आहे ती एका व्हीडिओची.... हा व्हीडिओ आहे एका चेटकीणीचा... आणि तो चक्क पोलिसांच्या नावावर खपवला जातोय....
नाशिककरांमध्ये या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू झालीय... गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर हा व्हिडिओ व्हायरल झालाय.
तसा हा व्हिडिओ बराच जुना आहे. मात्र सध्या पुन्हा एकदा हा व्हिडिओ सक्रीय झालाय. ‘नाशिकच्या टाकळी शिवारात पेट्रोलिंगच्या वेळी अचानक पोलिसांच्या जीपसमोर चेटकीण आली. त्यावेळी पोलीस हवलदार बनसोडे यांनी हा चित्तथरारक व्हिडिओ काढल्याच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पसरवलं जातंय.’अंधश्रधा निर्मूलन समितीनं त्यावर आक्षेप घेतलाय.
पोलीस मात्र कायद्याच्या चौकटीत अडकले असल्यानं हतबल आहेत. जोपर्यंत कुणी तक्रारदार समोर येत नाही, तोपर्यंत कारवाई करता येत नसल्याचं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
सुप्रीम कोर्टानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिलाय. त्यामुळं नेटीझनस्मध्ये आनंदच वातावरण आहे. मात्र हा आनंद साजरा करताना प्रत्येकानं सदसद्तविवेकबुद्धी
शाबूत ठेवणही तितकाच गरजेचं आहे. कारण असे खोटे व्हिडिओ आणि पोस्ट थांबवायला खाकी वर्दीच्या पोलिसांची नाही तर तुमच्या आमच्यामध्ये दडलेल्या सोशल पोलिसाची आवश्यकता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.