स्वागत " आयएनएस चक्र " चे

अमित जोशीसंरक्षण दलात कुठलेही एखादे मोठे नवीन शस्त्र म्हणजे लढाऊ किंवा मालवाहू विमान, रणगाडा किंवा युद्धनौका दाखल करुन घेतले जाते तेव्हा अगदी वाजत गाजत, समारंभाद्वारे सेवेत दाखल करुन घेण्याचा कार्यक्रम पार पाडला जातो.

Updated: Jan 30, 2012, 08:58 PM IST
 
अमित जोशी
 
 
संरक्षण दलात कुठलेही एखादे मोठे नवीन शस्त्र म्हणजे लढाऊ किंवा मालवाहू विमान, रणगाडा किंवा युद्धनौका दाखल करुन घेतले जाते तेव्हा अगदी वाजत गाजत, समारंभाद्वारे सेवेत दाखल करुन घेण्याचा कार्यक्रम पार पाडला जातो. विशेषतः तो रणगाडा, लढाऊ विमान किंवा युद्धनौका पहिल्यांदाच दाखल होणार असेल तर संरक्षण मंत्र्यांपासून संरक्षण दलाचे सर्वोच्च अधिकारी कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित रहातात. मात्र 23 जानेवारीला 2012 ला रशियाच्या दक्षिण-पूर्व भागातील ‘ व्लदिवोस्तोक ‘  या शहरातील नौदल तळावर झालेला कार्यक्रम हा अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडला.
 
 
भारताचे रशियातील राजदूत याच्यांसह भारत आणि रशियाच्या नौदालातील काही मोजके वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचा सोपस्कार मुद्दामहून साध्या पद्धधतीने पार पाडला गेला कारण या कार्यक्रमाचा फार गाजावजा भारताला करायचा नव्हता. मात्र या कार्यक्रमाचे भारताच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. कुठलीही प्रसिद्धी न करता ‘ आयएनएस चक्र-२ ‘ नावाची अणु ऊर्जेवर चालणारी पाणबूडी सेवेत दाखल करुन घेत भारतीय नौदलाने आपल्या सामर्थ्यात अत्यंत मोलाची भर टाकली. अणु ऊर्जेवर चालणा-या पाणबुड्या असलेल्या जगातील अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन या बलाढ्य देशांच्या पंक्तीत आता भारताने मानाचे स्थान मिळवले आहे.
आयएनएस चक्र चे महत्व जाणून घेण्याआधी या पाणबुडीची वैशिष्ट्ये जाणून घेऊ.
 
 
 
 
 
आयएनएस चक्र-2 ची वैशिष्ट्ये
1993 ला रशियाने  ‘ K-152 Nepra ‘  नावाची अकूला-2 जातीमधील अणु पाणबुडी बांधायला घेतली. मात्र त्या काळात अडचणीत असलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे रशियाने हे काम अर्थवट सोडून दिले. त्यानंतर 2004 ला भारताने रशियाशी केलेल्या कराराने अर्धवट राहिलेलेबांधकाम पुन्हा सुरु झाले. अखेर 2009 ला ‘ K-152 Nepra‘  रशियाच्या नौदलात दाखल झाली. आणखी काही चाचण्या घेत भारतीय नौदलाने ही अणु ऊर्जेवर चालाणारी पाणबुडी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल करुन घेतली.आयएनएस चक्र - 2 असे या पाणबुडीचे नामकरण करण्यात आले असून यापुढील 10 वर्षे भाडेतत्वावर ही पाणबुडी भारत वापरणार आहे.  
 
 
या संपूर्ण व्यवहारासाठी तब्बल 5,000 कोटी रुपये भारताने मोजले आहेत. 8,000 टन वजनाची ही पाणबुडी समुद्रात जास्तीत जास्त 600 मीटर खोलीपर्यंत जाऊ शकते. एवढेच नाही तर पाण्याखाली ताशी 60 किलोमीटर वेगाने जाण्याची क्षमता आहे. 300 किलोमीटर पर्यंत मारा करु शकणारीKlub-S  ही क्रुझ क्षेपणास्त्रे या पाणबुडीवर आहेत. म्हणूनच कमी अंतरावर हल्ला करणा-या वर्गातील ही पाणबुडी जगामध्ये सर्वात वेगवान आणि अत्यंत धोकादायक म्हणून ओळखली जाते. विविध अधिका-यांसह एकुण 73 नोसैनिक या पाणबुडीवर असतील. पाण्याच्या पृष्ठभागावर न येता सलग 100 दिवस पाण्याखाली संचार करण्याची क्षमता हे या पाणबुडी सर्वात मोठे वैशिष्टये.
या आधी 1988-91 दरम्यान भारताने चार्ली जातीमधील अणु पाणबुडी तीन वर्षासाठी सोव्हिएत रशियाकडून भाड्याने घेतली होती. तेव्हा त्या पाणबुडीचे नाव आयएनएस चक्र असे ठेवण्यात आले होते. म्हणून आता दाखल केलेल्या नव्या अणु पाणबुडीचे नाव आयएनएस चक्र - 2 असे ठेवण्यात आले आहे. 

आयएनएस चक्र-2 च
Tags: