महिला पर्यटकांसाठी जगातील 10 सर्वात असुरक्षित देश, जाण्यापूर्वी एकदा विचार करा

Unsafe Countries For Women Tourist : जगभरात महिलांसंबंधित गुन्ह्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. महिला असुरक्षितता ही एक मोठी समस्या बनली आहे. आजकाल अनेक महिला पर्यटक जगातील नवीन ठिकाण पाहण्यासाठी विविध देशांमध्ये प्रवास करत असतात. यातील काही देश हे महिलांसाठी असुरक्षित असतात अशावेळी तेथे जाताना विशेषतः महिला पर्यटकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. तेव्हा असे कोणते देश आहेत जे महिला पर्यटकांसाठी असुरक्षित मानले जातात याविषयी जाणून घेऊयात. 

Pooja Pawar | Feb 08, 2025, 13:44 PM IST
1/9

महिला पर्यटकांसाठी सर्वात धोकादायक देश म्हणून दक्षिण आफ्रिका या यादीत अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक महिलांनाही रात्रीच्यावेळी रस्त्याने एकट्याने चालताना असुरक्षित वाटते. तसेच या देशात महिलांच्या हत्या देखील मोठ्या प्रमाणावर होतात. 

2/9

ब्राझील हे प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असून लोकं येथे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जातात. परंतु महिला पर्यटकांसाठी हा दुसऱ्या क्रमांकाचा असुरक्षित देश आहे. येथे प्रवास करताना महिलांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. 

3/9

महिला असुरक्षिततेमध्ये रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. महिलांचा हेतुपुरस्सर खून करण्याच्या बाबतीत या देशाचा क्रमांक दुसरा लागतो.   

4/9

महिला पर्यटकांसाठी असुरक्षित असलेल्या देशांच्या यादीत मेक्सिको चौथ्या स्थानी आहे. येथे महिला हिंसाचाराचे प्रमाण जास्त असून येथे पर्यटनासाठी येताना महिलांनी सावधगिरी बाळगावी.   

5/9

इराण :

जागतिक लोकसंख्या पुनरावलोकनाच्या महिला डेंजर इंडेक्सनुसार इराण हा देश महिला असुरक्षिततेमध्ये पाचव्या क्रमांकावर येतो. जेथे समाजात मोठ्या प्रमाणावर लैंगिकतेच्या आधारावर भेदभाव केला जातो. 

6/9

इजिप्त :

महिला पर्यटकांसाठी असुरक्षित असलेल्या देशांच्या यादीत इजिप्त हा देश सातव्या स्थानावर आहे. येथील फक्त 47% टक्के महिलांना रात्री रस्त्यावरून एकट्याने चालण्यास सुरक्षित वाटतं मात्र उर्वरित महिलांना येथे रात्रीच्यावेळी एकट्याने फिरण्यास सुरक्षित वाटत नाही.   

7/9

मोरोक्को :

महिला पर्यटकांच्या असुरक्षिततेमध्ये मोरोक्को हा देश आठव्या स्थानावर आहे. येथे प्रवास करताना महिलांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. 

8/9

भारत :

या यादीत भारताचा क्रमांक नववा आहे. भारतात महिला हिंसाचाराचे प्रमाण जास्त आहे. तसेच येथे पर्यटनासाठी येणाऱ्या महिलांना काही ठिकाणी वावरताना सावधगिरी बाळगावी लागते.  

9/9

थायलंड :

महिला पर्यटकांच्या असुरक्षिततेमध्ये थायलंड देशाचा क्रमांक दहावा येतो. जागतिक लोकसंख्या पुनरावलोकनाच्या महिला डेंजर इंडेक्सनुसार थायलंडमध्ये जोडीदाराकडून होणाऱ्या हिंसाचाराचे प्रमाण जास्त आहे.