इंजिनीअरिंगचे शिक्षण, आयकर अधिकारी, आंदोलन ते राजकारण; अरविंद केजरीवालांबद्दलच्या 10 गोष्टी!

 रेव्हेन्यू सर्व्हिसचे अधिकारी,आंदोलन आणि राजकारण हा अरविंद केजरीवालांचा प्रवास कसा होता? याबद्दल जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Feb 08, 2025, 13:28 PM IST

Arvind Kejriwal Political Career: रेव्हेन्यू सर्व्हिसचे अधिकारी,आंदोलन आणि राजकारण हा अरविंद केजरीवालांचा प्रवास कसा होता? याबद्दल जाणून घेऊया. 

1/10

इंजिनीअरिंगचे शिक्षण, आयकर अधिकारी, आंदोलन ते राजकारण; अरविंद केजरीवालांबद्दलच्या 10 गोष्टी!

Delhi Election Result Arawind Kejriwal Political Career Marathi News

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनादेखील आपली जागा राखता आली नाही. त्यांचा 1200 मतांनी पराभव झाला.

2/10

केजरीवालांचा प्रवास

Delhi Election Result Arawind Kejriwal Political Career Marathi News

निवडणुकांचे कल येत असताना सुरुवातीपासूनच भाजप आघाडीवर दिसत होते. सलग दोन वर्षे सत्तेत असल्या आम आदमी पार्टीला दिल्लीत हॅट्ट्रीक करण्याची संधी हुकली. रेव्हेन्यू सर्व्हिसचे अधिकारी,आंदोलन आणि राजकारण हा अरविंद केजरीवालांचा प्रवास कसा होता? याबद्दल जाणून घेऊया.

3/10

आयकर विभागात नोकरी

Delhi Election Result Arawind Kejriwal Political Career Marathi News

अरविंद केजरीवाल एकूण 10 वर्षे दिल्लीचे मुख्यमंत्री राहिले होते. त्यांनी आयआयडी खरगपूरमधून मॅकेनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. राजकारणात येण्यापुर्वी त्यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस म्हणजेच आयकर विभागात सहायक आयकर आयुक्त म्हणून त्यांना नोकरी मिळाली. पण सिस्टिम बदलली पाहीजे, असे त्यांना नेहमी वाटायचे. 

4/10

नोकरी सोडली

Delhi Election Result Arawind Kejriwal Political Career Marathi News

केजरीवाल यांनी 2006 साली नोकरी सोडली आणि स्वत:ची एनजीओ चालवली. यानंतर 2011 मध्ये आण्णा आंदोलनात सहभागी झाले. पुढे जाऊन त्यांनी 2012  साली आपला स्वत:ची आम आदमी पार्टी बनवली. वर्षभरातच 2013 मध्ये शिला दिक्षीत या मजबूत पर्याय म्हणून पुढे आल्या.  2013 साली काँग्रेसची  15 वर्षाची सत्ता गेली. 

5/10

शालेय शिक्षण

Delhi Election Result Arawind Kejriwal Political Career Marathi News

हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील सिवानी गावात अरविंद केजरीवाल यांचा जन्म झाला. मिशनरी शाळेतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. 2015 आणि 2020 मध्ये त्यांनी प्रचंड बुहमताने निवडणूक जिंकली.

6/10

49 दिवसात द्यावा लागला राजीनामा

Delhi Election Result Arawind Kejriwal Political Career Marathi News

2013 मध्ये दिल्लीमध्ये त्रिशंकू विधानसभा बनली तेव्हा काँग्रेसच्या पाठींब्याने ते पहिल्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री बनले. पण केजरीवाल यांना 49 दिवसातच खुर्ची खाली करावी लागली. 14 फेब्रुवारी 2014 रोजी त्यांनी राजीनामा दिला.

7/10

जनलोकपाल विधेयकावरुन वाद

Delhi Election Result Arawind Kejriwal Political Career Marathi News

केजरीवाल यांच्या पार्टीने लोकपाल विधेयक आणण्याचे आश्वासन दिले होते. सरकार बनवण्यासाठी भाजपने आपवर दबाव आणला आणि केजरीवालांना घेरलं. लोकपाल बील संमत करण्यासाठी त्यांना तत्कालीन उपराज्यपाल नजीब जंग यांची सहमती आवश्यक होती. पण याशिवाय केजरीवालांनी बिल विधानसभेत आणण्याचा प्रयत्न केला. ज्याला कांग्रेस आणि भाजप दोघांनी विरोध केला. निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण न करु शकल्याने त्यांनी राजीनामा दिला. 

8/10

2015 मध्ये रेकॉर्ड, आपला 67 जागा

Delhi Election Result Arawind Kejriwal Political Career Marathi News

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होती. यानंतर 2015 मध्ये आपने मोठी उडी घेतली आणि 39 सीट जादा मिळवल्या. त्यांनी 67 जागा जिंकल्या. यानंतर 14 फेब्रुवारी 2015 ला ते पुन्हा मुख्यमंत्री बनले. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना विजय मिळाला आणि ते तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री बनले.

9/10

तिहाड जेलमध्ये केजरीवाल

Delhi Election Result Arawind Kejriwal Political Career Marathi News

2024 मध्ये केजरीवालांच्या अडचणी वाढल्या. मार्चमध्ये दारु घोटाळ्यासंदर्भातील मनी लॉंड्रींग केसमध्ये त्यांना तुरुंगवास झाला. यानंतर 10 मेला त्यांना 21 दिवसांची पेरॉल मिळाली. 2 जूनला त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागले.

10/10

9 वर्षे 316 दिवस सलग मुख्यमंत्री

Delhi Election Result Arawind Kejriwal Political Career Marathi News

21 सप्टेंबर 2024 पर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री राहिल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ते 49 दिवस मुख्यमंत्री राहिले. यानंतर 9 वर्षे 316 दिवस सलग त्यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची संभाळली.