Toll Charges : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील टोलच्या दरात तब्बल 18 टक्के वाढ; कोणत्या वाहनाला किती पैसे भरावे लागणार?
Mumbai Pune Expressway Toll Charges : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल१८ टक्क्यांनी वाढणार आहे, 1 एप्रिलपासून या दरवाढीची अंमलबजावणी होणार आहे.
Mumbai Pune Expressway Toll Charges : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील प्रवास महागणार आहे. कारण एक्स्प्रेस वेवरील टोलच्या दरात तब्बल 18 टक्के वाढ होणार आहे. हे नवे दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा वाहन चालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

