2 तास 37 मिनिटांचा 'तो' चित्रपट, ज्याने सर्व ॲक्शन-थ्रिलर चित्रपटांवर फिरवले पाणी; याच्यापुढे 'महाराजा'ही झाला फेल
Suspense Action Thriller Movie: आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाचे सजेशन घेऊन आलो आहोत.
तेजश्री गायकवाड
| Jan 21, 2025, 17:46 PM IST
Suspense Action Thriller Movie: आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाचे सजेशन घेऊन आलो आहोत.
1/7
2/7
तुम्हालाही चित्रपट पाहण्याची आवड असेल आणि तुम्हाला सस्पेन्स-थ्रिलर ॲक्शन चित्रपट पाहायला आवडत असतील, तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम चित्रपट शोधून आणला आहे. तसं पाहिलं तर, गेल्या काही वर्षांत दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वच चित्रपट नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ, वूट, हॉटस्टार यांसारख्या अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर खूप चित्रपट आले.
3/7
4/7
तर 'थेरी' असे या सस्पेन्स ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट 2 तास 37 मिनिटांचा आहे. यामध्ये तुम्हाला अभिनेता विजय थलपथी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विजयसोबत तुम्हाला सामंथा रुथ प्रभू आणि एमी जॅक्सन देखील बघायला मिळेल. तुम्हाला या चित्रपटाची कथा खूप आवडेल आणि ॲक्शन सीनसुद्धा दमदार आहेत. हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याने 150 कोटी रुपयांची कमाई केली.
5/7
'थेरी' चित्रपटाच्या कथेत विजयची मुख्य भूमिका असून त्याच्यासोबत एमी जॅक्सनने शिक्षिकेची भूमिका साकारली आहे. सामंथाने विजयच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची कथा केरळमध्ये एक बेकरी चालवणाऱ्या व्यक्तीची आहे. ज्याला हिंसा अजिबात आवडत नाही आणि तो त्याची 5 वर्षांची मुलगी निवेदिता हिच्यासोबत शांततेचे जीवन जगत आहे. जोसेफ लवकरच तिच्या मुलीच्या शिक्षकाशी मैत्री करतो.
6/7
त्याचवेळी बेकरी चालवणाऱ्या व्यक्तीचा भूतकाळ जेव्हा शिक्षिकेला कळला तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. तो एक धाडसी पोलीस निरीक्षक आहे. हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर मोफत पाहू शकता. तुम्ही हे कुठेही सहज मिळवू शकता. या चित्रपटातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्लायमॅक्स.जो बघायला विसरू नका. या चित्रपटाच्या पुढे 'महाराजा'ही अपयशी ठरला आहे.
7/7