Shikhar Dhawan Records: शिखर धवनच्या करिअरमधील 5 मोठे रेकॉर्डस्, जे विराट- रोहित सुद्धा मोडू शकत नाहीत

भारताचा स्टार क्रिकेटर आणि फॅन्समध्ये 'गब्बर' यानावाने प्रसिद्ध असलेला शिखर धवन याने 24 ऑगस्ट रोजी सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून निवृत्तीची घोषणा केली. शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो बरीच वर्ष टीम इंडियाकडून खेळला. शिखरने भारताकडून 34 टेस्ट, 167 वनडे आणि 68 टी20 खेळत असताना अनेक मोठे रेकॉर्ड केले. त्यातील गब्बरचे 5 महारेकॉर्ड्स दिग्गज क्रिकेटर्सला तोडणे कठीण आहे. 

Aug 24, 2024, 17:14 PM IST
1/5

100 व्या वनडे सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय :

माजी क्रिकेटर शिखर धवन याने त्याचा 100 वा वनडे सामना खेळताना शतक ठोकले होते. अशी कामगिरी करणारा शिखर धवन हा पहिला भारतीय फलंदाज ठरला होता. त्याने 2018 मध्ये ही कामगिरी केली होती. 

2/5

टेस्ट डेब्यूमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा रेकॉर्ड :

शिखर धवनने 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या पदार्पणातच वेगवान शतक ठोकले होते. अशी कामगिरी करणारा शिखर धवन हा एकमात्र क्रिकेटर आहे. शिखर धवनने केवळ 85 बॉलमध्ये शतक पूर्ण केले होते.

3/5

वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात वेगवान 2000 आणि 3000 धावा करणारा फलंदाज :

माजी क्रिकेटर शिखर धवन याच्या नावावर वनडे क्रिकेटचा एक खास रेकॉर्ड आहे. त्याने भारतासाठी एकदिवसीय फॉरमॅटमध्ये सर्वात वेगवान 2000 आणि 3000 धावा केल्या होत्या.  

4/5

एका कॅलेंडर इयरमध्ये टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा :

एका कॅलेंडर इयरमध्ये टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करण्याचा रेकॉर्ड शिखर धवनच्या नावावर आहे. त्याने एका वर्षात टी 20 आंतरराष्ट्रीयमध्ये 689  धावा केल्या होत्या. शिखर धवनचा हा रेकॉर्ड अद्याप कोणताही भारतीय फलंदाज तोडू शकला नाही. 

5/5

टेस्ट डेब्यूवेळी फलंदाजाकडून सर्वात वेगवान खेळी :

शिखर धवनने त्याच्या टेस्टमध्ये डेब्यू 174 बॉलमध्ये 187 धावा केल्या. टेस्ट डेब्यू दरम्यान कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वात वेगवान खेळी होती.