PHOTO: भरपूर घाम येतो? 'या' 6 लक्षणांवरुन ओळखा हार्ट अटॅकचे संकेत, 80% धोका होईल कमी
Heart Attack Warning Signs : हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसतात. ज्यावरुन तुम्ही जीवघेणा प्रकार टाळू शकता. शरीरातील या 6 संकेतावरुन ओळखा हार्ट अटॅकचा धोका...
Heart Attack Warning Signs in Marathi: हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपले शरीर अनेक प्रकारचे सिग्नल देऊ लागते. कोणत्याही रुग्णाला हृदयविकाराचा झटका येतो जेव्हा हृदयातील रक्त प्रवाह खूप कमी होतो किंवा ब्लॉक होतो. हृदयातील रक्त अवरोध हे सहसा हृदयाच्या धमन्यांमध्ये चरबी, कोलेस्ट्रॉल आणि इतर पदार्थांच्या साठ्यामुळे होते. आजकाल तरुण असो वा वृद्ध, प्रत्येकजण हृदयविकाराचा बळी ठरत आहे. हे इतके अचानक घडते की रुग्णाला रुग्णालयात पोहोचण्यासही वेळ मिळत नाही आणि त्याचा लगेच मृत्यू होतो. अशा परिस्थितीत, लोकांना असे वाटते की हृदयविकाराचा झटका अचानक येतो. हे रोखणे अशक्य आहे, परंतु हृदयविकाराच्या तीन-चार महिन्यांपूर्वी शरीर आपल्याला काही संकेत देऊ लागते, जे आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे.
घाम येणे
![घाम येणे Sings and Symptoms of Heart Attack](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/08/737236-sweating.png)
अनेकांना कोणताही व्यायाम, वर्कआऊट किंवा कोणतेही हालचाल करणारे काम करत नसतानाही प्रचंड घाम येतो. घामाघुम होणे, अस्वस्थता, मन घाबरणे यासारखी लक्षणे दिसल्यास, सावध व्हा. कारण हृदयापर्यंत रक्ताचा पुरवठा नीट होत नसेल. तर अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे घाम येण्याकडे दुर्लक्ष करु नका. अनावश्यक किंवा रोजच्यापेक्षा जास्त घाम येत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.
श्वास घेण्यास त्रास होणे
![श्वास घेण्यास त्रास होणे Sings and Symptoms of Heart Attack](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/08/737235-breathing.png)
हार्ट अटॅक येण्याअगोदर अनेकांना श्वसनाची समस्या जाणवते. छातीत जडपणा वाटणे, अशक्तपणा आणि मन अस्वस्थ असल्यासारखं वाटणं या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. जर तुम्हाल बेल्ट अराऊंड चेस्ट किंवा वेट ऑन चेस्ट असं वाटत असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. हृदयाला व्यवस्थीत रक्तपुरवठा होत नसेल तर श्वसनाला त्रास होतो.
उल्टी आणि चक्कर येणे
![उल्टी आणि चक्कर येणे Sings and Symptoms of Heart Attack](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/08/737234-vomiting.png)
चक्कर येणे किंवा डोळ्यासमोर अंधारी येणे ही उन्हाची लक्षणे वाटत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण हे लक्षण हार्ट अटॅक येण्यापूर्वीचं आहे. या लक्षणांमुळे तुमचा ब्लड प्रेशरही कमी होऊ शकते. एवढंच नव्हे तर हृदयाला नीट रक्तपुरवठा होत नसेल तरीही ही समस्या जाणवते. त्यामुळे या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.
मान आणि जबडा दुखणे
![मान आणि जबडा दुखणे Sings and Symptoms of Heart Attack](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/08/737233-neckpain.png)
पायांना सूज येणे
![पायांना सूज येणे Sings and Symptoms of Heart Attack](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/08/737232-legswelling.png)
हृदयाचे ठोके वाढणे
![हृदयाचे ठोके वाढणे Sings and Symptoms of Heart Attack](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/08/737230-heartbeat.png)
2 दिवस आधी शरीरात दिसतात बदल
![2 दिवस आधी शरीरात दिसतात बदल Sings and Symptoms of Heart Attack](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/08/737228-heartattack-4.png)