थंडीत जीवघेण्या आजारांपासून बचाव करतील या 8 भाज्या, आतापासून जेवणात करा समाविष्ट
Vegetables For Winter : थंडीचा गारवा मुंबईसह महाराष्ट्रात जाणवू लागला आहे. या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर करतात. अशावेळी या 8 भाज्या ठरतील यमदूत. तुमचा जीव वाचवतील भाज्या.
आजपासून मुंबईसह अनेक राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. ऑक्टोबर महिन्याची गरमी आणि थंडी यासगळ्यात खराब आणि दूषित वातावरणामुळे आरोग्य बिघडत चालले आहेत. थंडीत स्वतःचा बचाव करण्यासाठी आहारात काही पदार्थांचे समावेश करणे गरजेचे असते. ज्यामुळे सर्दी, खोकला, ताप यासारख्या अंग मोडून काढणाऱ्या आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता. (फोटो सौजन्य - iStock)
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने शरद ऋतूतील ऋतुमानाचे स्पष्टीकरण दिले आहे. हिवाळ्यातील आहारात पडवळ, दुधी, कारले, रताळ, मुळा, गाजर, बीटरूट आणि पांढरे पेठे यांचा समावेश करण्यास सांगितले आहे. साधे पाणी हिवाळ्यात प्यायल्यामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
During Sharad Ritu, prioritize sweet, bitter, and astringent vegetables such as Parwal, Bottle Gourd, Bitter Gourd, Ash Gourd, Yam, young radish, carrot, and beetroot. Boil water vigorously, shrink to 75%, and add pitta-reducing herbs.#AyurvedaDay2023 pic.twitter.com/7wSF70t8wZ
— Ministry of Ayush (@moayush) October 24, 2023