Viral News : कोकणातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो रशिया मुलगा; फोटो व्हायरल
आपल्या कोकणी मित्रांबरोबर संवाद साधताना त्याला भाषेचा कोणताही अडसर जाणवत नाही. मराठीतले काही शब्द तसेच अंक तो लिहायला आणि बोलायला शिकला आहे. येथील भाषा, संस्कृती , खाद्यपदार्थ यावर तो प्रेम करू लागला आहे.
Russian Boy Studying In Maharashtra School : मिरॉन नावाचा अकरा वर्षाचा रशियन मुलगा कोकणातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहे. आई-वडिलांबरोबर भारत फिरण्यासाठी आला होता. भारत भ्रमंती करत असताना सिंधुदुर्ग मधल्या आजगाव गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला त्याने भेट दिली. आई वडिलांकडे त्याने याच शाळेत शिकायचे आहे असा हटट् धरला. गेले महिनाभर मिरॉन याच शाळेत शिकत आहे. शाळेतील मुलांबरोबर तो मराठीमध्ये शिक्षण घेत आहे . वर्गातील मित्रांबरोबर खेळांमध्ये आणि कवायतींमध्ये देखील तो सहभागी होत आहे.