गौहर खानने खरेदी केली नवीन मर्सिडीज, किंमत पाहून व्हाल हैराण

गौहर खानच्या कार कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच अभिनेत्रीने नवीन कार खरेदी केली असून तिचे फोटो शेअर केले आहेत. 

| Dec 22, 2024, 19:32 PM IST
1/7

नेहमी चर्चेत

लोकप्रिय अभिनेत्री गौहर खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांनी सोशल मीडियावर चर्चेत असते. अशातच ती आता तिच्या नवीन कार खरेदीमुळे चर्चेत आली आहे.   

2/7

गौहर खान

बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानने नुकतीच एक नवीन मर्सिडीज कार खरेदी करून तिचे कार कलेक्शन वाढवले आहे.

3/7

मर्सिडीज कार

गौहर खानने मर्सिडीज-बेंझ ई-क्लास लक्झरी सेडान कार खरेदी केली आहे. जी गेल्या वर्षी विक्रीसाठी आली होती. या कारची किंमत 1 कोटी रुपये आहे. 

4/7

फोटो शेअर

पांढऱ्या रंगाच्या या कारमध्ये अभिनेत्रीने तिच्या मुलासोबत बसलेले फोटो देखील शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

5/7

पती जैद दरबार

तिच्यासोबत पती जैद दरबारही दिसत आहे. दोघांच्या चेहऱ्यावर नवीन कार घेतल्याचा आनंद स्पष्ट दिसत आहे. ही कार स्वयंचलित आहे. 

6/7

तीन प्रकार

मर्सिडीज-बेंझ ई-क्लास लक्झरी सेडान कार भारतीय बाजारपेठेत तीन प्रकारांमध्ये आहे. ज्यामध्ये E 200, E 200d आणि E 450. 

7/7

एक्स-शोरुम किंमत

गौहर खानच्या या कारची एक्स-शोरुम किंमत 78 लाख 50 हजार रुपयांपासून 1.5 कोटींपर्यंत आहे. अभिनेत्रीने या कारचे दुसरे मॉडेल खरेदी केले आहे.