'सगळं थांबवा, आम्हाला एकटं सोडा', व्हिडीओ शेअर करत करीनाने पापाराझींना फटकारले

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर करत पापाराझींना फटकारले आहे.   

Soneshwar Patil | Jan 20, 2025, 18:54 PM IST
1/7

सैफवर हल्ला

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि त्याचे कुटुंब गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. 16 जानेवारी रोजी करीनाच्या घरात चोर घुसला होता. त्याने सैफवर हल्ला केला होता. 

2/7

पापाराझींची गर्दी

या हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अशातच पापाराझी सैफच्या घराबाहेर गर्दी करताना दिसत आहेत.   

3/7

इन्स्टाग्राम स्टोरी

याच गोष्टीला कंटाळून करीना कपूर पापाराझींवर संतप्त झाल्याचं दिसून आलं आहे. करीनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करत तिने आम्हाला एकटे सोडा  म्हणत पापाराझींना फटकारले. 

4/7

कॅप्शन

त्यासोबतच तिने कॅप्शनमध्ये म्हटले की, हे सर्व आता थांबवा, आम्हाला एकटं राहू द्या. पापाराझींच्या सततच्या गोष्टींना करीना कंटाळली असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

5/7

प्रायव्हसीची मागणी

हल्ल्यानंतर करीना कपूरच्या टीमने कुटुंबासाठी प्रायव्हसीची मागणी केली होती. त्यासोबतच कोणत्याही प्रकारचे अनुमान न लावण्याची आणि अफवांपासून दूर राहण्याची विनंती केली होती.   

6/7

डिस्चार्ज

सध्या सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही दिवसांमध्ये सैफला डिस्चार्ज दिला जावू शकतो असे देखील म्हटले जात आहे. 

7/7

सर्वांचे लक्ष

करीना कपूर देखील सतत हॉस्पिटलमध्ये फेऱ्या मारताना दिसत आहे. आता सर्वांचे लक्ष सैफ अली खानच्या डिस्चार्जकडे लागले आहे.