रक्तबंबाळ अवस्थेतील सैफ अली खानला मदत करणाऱ्या रिक्षाचालकाला किती बक्षीस मिळालं माहितीये?

रिक्षातून उतरल्यानंतर 'स्ट्रेचर घेऊन ये, मी सैफ अली खान आहे' असं वाक्य ऐकल्यानंतर रिक्षाचालकाला अभिनेत्याची ओळख पटली.   

Shivraj Yadav | Jan 20, 2025, 19:02 PM IST

रिक्षातून उतरल्यानंतर 'स्ट्रेचर घेऊन ये, मी सैफ अली खान आहे' असं वाक्य ऐकल्यानंतर रिक्षाचालकाला अभिनेत्याची ओळख पटली. 

 

1/9

16 जानेवारीच्या रात्री चाकू हल्ला झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला रिक्षाने रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यावेळी घरी कोणीही ड्रायव्हर हजर नव्हता.  

2/9

सैफ मुलगा तैमूर आणि आणखी एका व्यक्तीसह रिक्षाने लिलावती रुग्णालयात गेला होता. रुग्णालयात गेल्यानंतर आपली ओळख सांगत सैफने गार्डकडे स्ट्रेचर मागितलं.   

3/9

तेव्हा रिक्षाचालकाला आपल्या रिक्षात असणारी व्यक्ती इतर कोणी नाही तर सैफ असल्याचं समजलं होतं.  

4/9

रिक्षाचालकाला आपल्या या चांगल्या कामाची अखेर शाबासकी मिळाली आहे. रिक्षाचालक भजन सिंगला 11 हजारांचं रोख बक्षीस मिळालं आहे.   

5/9

एका संस्थेने भजन सिंग यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे. रिक्षाचालकाचा बक्षीस स्विकारतानाचा फोटो समोर आला आहे.   

6/9

रिक्षा चालकाने सांगितलं होतं की, त्यादिवशी मी नाईट ड्युटीवर होतो. मी सैफला बिल्डिंगच्या गेटच्या बाहेर रिक्षात बसवलं होतं. तो जखमी अवस्थेत होता.   

7/9

अभिनेत्याने तेव्हा सफेद रंगाचा कुर्ता घातला होता, जो पूर्णपणे रक्ताने माखला होता. सर्वांनी चर्चा करुन लिलावती रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला होता.   

8/9

रिक्षातून उतरल्यानंतर 'स्ट्रेचर घेऊन ये, मी सैफ अली खान आहे' असं वाक्य ऐकल्यानंतर रिक्षाचालकाला अभिनेत्याची ओळख पटली.   

9/9

सैफची प्रकृती सध्या स्थिर आहे. अद्याप त्याला डिस्चार्ज मिळालेला नाही. त्याच्यावर दोन सर्जरी करण्यात आल्या आहेत.