PHOTO : ऐकून विश्वास बसणार नाही, पण करीना अन् करिश्माचा भाऊ आहे आफताब शिवदासानी!

Entertainment : या बॉलिवूड अभिनेत्याचा क्यूट लूकमुळे लाखो तरुणी त्याचा मागे वेड्या होत्या. कपूर कुटुंबाशी संबंधित असूनही या अभिनेत्याला बॉलिवूडमध्ये खूप संघर्ष करावा लागला. तरी देखील त्याला बॉलिवूडमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

नेहा चौधरी | Feb 15, 2025, 17:03 PM IST
1/9

बॉलिवूडमध्ये खूप कमी स्टार असे आहेत, ज्यांचा पहिला चित्रपट हिट झाला पण नंतर ते अचानक चित्रपटसृष्टीतून ते गायब झाले. आज अशाच अभिनेत्याबद्दल आम्ही सांगणार आहोत, ज्याचा संबंध कपूर कुटुंबाशी आहे. त्याचा पहिला चित्रपट हा सुपर डुपर हिट झाला होता. तरी देखील बॉलिवूडमध्ये तो नावारुपाला आला नाही. 

2/9

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून आफताब शिवदासानी आहे. आफताब शिवदासानीने बाल कलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती. वयाच्या नवव्या वर्षी आफताब पहिल्यांदाच अनिल कपूरच्या सुपरहिट मिस्टर इंडियामध्ये झळकला होता. त्यासोबतच 1988 मधील शहेनशाह या चित्रपटात इन्स्पेक्टर विजयकुमार श्रीवास्तव यांची बालपणीची भूमिका त्याने साकारली होती. तसाच तो आव्वल नंबर, चालबाज आणि इन्सानियतमध्ये अभिनया केला आहे. 

3/9

आफताब शिवदासानी वयाच्या 19 व्या वर्षांपर्यंत जाहिरात काम करायचा. तेव्हा दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांची नजर तो पडला. त्याने मस्त चित्रपटात उर्मिला मातोंडकरसोबत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. कॉलेजमध्ये शिकत असताना हा चित्रपट त्याने केला आणि तो सुपर डुपर हिट ठरला. 

4/9

अनेक चित्रपटांमध्ये काम करुनही त्याला प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यश आलं नाही. त्याने जवळपास 40 फ्लॉप चित्रपटात काम केलंय. बॉलिवूडमधील करिअर फ्लॉप ठरला. तुम्हाला आठवत असेल तर त्याने स्पेशल ऑप्स 1.5 या मालिकेतही काम केलंय. 

5/9

खरं तर, एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्यानंतर आफताबचे करिअर उद्ध्वस्त झाले. तो आलू चाटमधील त्याची सह-अभिनेत्री आमना शरीफच्या प्रेमात पडला आणि मग त्याने आमनाला बॉलिवूडमध्ये स्थापित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आफताबने आमनाला कास्ट केले आणि २००९ मध्ये 'आओ विश करे'ची निर्मिती केली. तथापि, हा चित्रपट फ्लॉप झाला आणि आफताबचे आमनासोबतचे नातेही संपुष्टात आले.

6/9

आफताबवर ड्रग्ज घेतल्याचाही आरोप होता. यानंतर त्याला बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले. आफताब आता पडद्यावर दिसत नाही, तथापि, तो त्याच्या प्रॉडक्शन हाऊस आणि कार्यक्रमांमधून चांगली कमाई करतो.

7/9

आता तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, करीना आणि करिश्मा या आफताबच्या बहिणी आहेत. हो, बबिता आणि साधना यांच्याशी आफताबचा संबंध आहे. बबिता यांचे पती आणि अभिनेता रणधीर कपूर यांचा आज वाढदिवस आहे. चला तर आफताब आणि कपूर कुटुंबाच नातं जाणून घेऊयात. 

8/9

आफताब शिवदासानी यांचे कपूर कुटुंबाशीही नाते आहे. खरं तर, अभिनेत्री साधनाचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेत्री बबिताचे वडील हे सख्खे भाऊ होते. हरी शिवदासानी हे अभिनेत्री बबिताचे वडील आणि ते साधनाच्या वडिलांचे भाऊ देखील आहेत, म्हणूनच ते साधनाचे काका आहेत. 

9/9

म्हणजे, साधना शिवदासानी ही करीना आणि करिश्माची मावशी आहे. या अर्थाने, आफताब शिवदासानी हा करीना आणि करिश्माचा चुलत भाऊ आहे.