महाराष्ट्रातील 'या' ठिकाणांवर झालंय छावा चित्रपटाचं शूटिंग, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर

Chhaava Movie Location : विकी कौशल आणि रश्मीका मंधाना यांची मुख्य भूमिका असलेला आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. चित्रपटातील पात्र आणि छत्रपती संभाजी महाराजांचा मोठ्या पडद्यावर साकारलेला जीवनपट सर्वांच्याच मनाला भावतोय. भारतातील अनेक ठिकाणांवर या चित्रपटाचं शूटिंग पार पडलं असून यात अनेक महाराष्ट्रातील ठिकाणांचा देखील समावेश आहे. 

Pooja Pawar | Feb 15, 2025, 15:35 PM IST
1/7

वाई (महाराष्ट्र) :

महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचं आणि सुंदर ठिकाण असलेल्या वाई शहरात छावा चित्रपटाच्या काही भागांचं शुटिंग झालेलं आहे. यात मेणवली घाट वाई, धोम धरण यांचा समावेश आहे. येथील निसर्गरम्य घाट आणि अनेक प्रचिलित मंदिर येथील आकर्षण असून शहरातील काही ठिकाण छावा चित्रपटामध्ये दिसून येतायत. 

2/7

महाबळेश्वर (महाराष्ट्र) :

हिरव्यागार सौंदर्याने नटलेल्या आणि धुक्यांनी झाकलेल्या अनेक टेकड्या तुम्ही छावा या चित्रपटामध्ये पाहू शकता. बारामोतीची विहीर या ठिकाणाचा समावेश आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय हिल स्टेशन असणाऱ्या या ठिकाणी पर्यटनाची अनेक ठिकाण प्रेक्षकांचं आकर्षण ठरतात. 

3/7

पुणे (महाराष्ट्र) :

पुण्यातील काही ऐतिहासिक किल्ले आणि शाही राजवाडे तुम्ही छावा चित्रपटामध्ये पाहू शकता. शहराचा आर्किटेक्चरल वारसा या चित्रपटात चित्रित केलेल्या मराठा साम्राज्याच्या भव्यतेशी उत्तम प्रकारे पूरक आहे. त्यामुळे चित्रपटातील अनेक मुख्य भागाचे शूटिंग पुण्यातील विविध ठिकाणांवर पार पडेल. 

4/7

कर्जत (महाराष्ट्र) :

कर्जतमधील अनेक फिल्म स्टुडिओ आणि येथील निसर्गरम्य लँडस्केप हे ऐतिहासिक चित्रपटांच्या शूटिंगसाठी पूरक वातावरण निर्माण करतात. त्यामुळे छावा चित्रपटाच्या काही भागांचं शूटिंग कर्जतमधील प्रसिद्ध स्टुडिओ आणि ठिकाणांवर पार पडेल. 

5/7

मुंबई (महाराष्ट्र) :

छावा चित्रपटातील अनेक भागांचं शूटिंग हे मुंबईतील विविध फिल्म स्टुडिओमध्ये झालेलं आहे. यात गोरेगाव फिल्म सिटीतील अनेक ठिकाणांचा समावेश आहे. 

6/7

जयपूर (राजस्थान) :

राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर मध्ये देखील छावा चित्रपटाचे शूटिंग पार पडलं आहे. येथील शहरात असणारे राजवाडे आणि मराठा साम्राज्य समृद्धी मोठ्या पडद्यावर भव्य दिव्य दिसतात. 

7/7

उदयपूर (राजस्थान) :

उदयपूरला सिटी ऑफ लेक असे म्हंटले जाते. येथील राजवाडे आणि सुंदर तलाव चित्रपटाच्या सीन्समध्ये दिसून येतील.