PHOTOS: वयाच्या 48 व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्याचे दुसरे लग्न, 26 वर्षांनी लहान मुलीशी बांधली लग्नगाठ

या फोटोने सर्वांनाच चकित केले आहे. याशिवाय त्याचे चाहतेही त्याच्या लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. चला जाणून घेऊयात कोण आहे का अभिनेता आणि त्याची नवीन बायको. 

तेजश्री गायकवाड | Feb 15, 2025, 13:14 PM IST

या फोटोने सर्वांनाच चकित केले आहे. याशिवाय त्याचे चाहतेही त्याच्या लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. चला जाणून घेऊयात कोण आहे का अभिनेता आणि त्याची नवीन बायको. 

1/9

Sahil Khan Marries Milena Alexandra: अलीकडे, सोशल मीडियावर काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, जे एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो आहेत. ज्यामध्ये तो दुबईतील बुर्ज खलिफा खाली त्याच्यापेक्षा २६ वर्षांनी लहान मुलीसोबत पोज देताना दिसत आहे.   

2/9

या फोटोने सर्वांनाच चकित केले आहे. याशिवाय त्याचे चाहतेही त्याच्या लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. चला जाणून घेऊयात कोण आहे का अभिनेता आणि त्याची नवीन बायको.   

3/9

आम्ही बोलत आहोत 2001 मध्ये रिलीज झालेल्या 'स्टाइल' आणि 'एक्सक्यूज मी' सारख्या कॉमेडी चित्रपटांद्वारे आपला ठसा उमटवणारा अभिनेता साहिल खानबद्दल. साहिल बराच काळ चित्रपट जगतापासून दूर आहे, परंतु अलीकडेच तो त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे.  

4/9

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने त्याने त्याची प्रेयसी मिलेना अलेक्झांड्राशी दुसरे लग्न केले. या खास प्रसंगी, दुबईतील बुर्ज खलिफा येथे लग्झरी वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये कपलचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.  

5/9

या भव्य सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साहिल खानने स्वतः इंस्टाग्रामवर त्याच्या लग्नाची झलक शेअर केली, जी चाहत्यांना खूप आवडते. लग्नाच्या दिवशी, साहिलने क्लासिक ब्लॅक टक्सिडो घातला होता, ज्यामध्ये तो खूप स्टायलिश दिसत होता. त्याच वेळी, त्याची पत्नी मिलेना अलेक्झांड्राने लांब बाही असलेला एक सुंदर पांढरा गाउन परिधान केला होता, ज्यामध्ये ती राजकुमारीपेक्षा कमी दिसत नव्हती. या भव्य लग्नाचे खास आकर्षण म्हणजे त्यांचा 6 मजली वेडिंग केक होता, जो पांढऱ्या फुलांनी सजवण्यात आला होता.

6/9

त्याची एक झलक शेअर करताना अभिनेत्याने लिहिले, 'वेडिंग केक हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा केक आहे... जस्ट गॉट मॅरिड!'. आणखी काही फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, 'जस्ट लग्न माझ्या बेबीसोबत झाले'. कमेंट सेक्शनमध्ये चाहते त्यांचे लग्नासाठी अभिनंदन करत आहेत.  

7/9

साहिल खान आणि त्याची पत्नी मिलेना यांच्या वयात 26 वर्षांचा फरक आहे. रिपोर्ट्सनुसार, साहिल 48 वर्षांचा आहे, तर मिलेना फक्त 22 वर्षांची आहे. यावर अभिनेता हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, 'ती खूप हुशार आहे, पण त्याचबरोबर ती संवेदनशीलही आहे'.  

8/9

तो पुढे म्हणाला, 'कारण ती माझ्यापेक्षा खूप लहान आहे. पण ती तिच्या वयाच्या इतर मुलींच्या तुलनेत अधिक मोठी आणि शांत आहे.' त्याने असेही सांगितले की मिलेना ही बेलारूस, युरोपची आहे आणि तिने गेल्या वर्षीच आपले शिक्षण पूर्ण केले आहे. दोघांनी रशियात एंगेजमेंट केली आणि आता त्यांनी लग्न केले आहे. करिअरबद्दल बोलायचे झाले तर साहिल खानने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, पण त्याला फारसे यश मिळाले नाही. त्यांचे सलग सहा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.  

9/9

यानंतर त्याने फिटनेस इंडस्ट्रीत प्रवेश केला आणि आज तो एक यशस्वी फिटनेस ट्रेनर आणि बिझनेसमन आहे. चित्रपटांमध्ये अयशस्वी होऊनही त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली असून फिटनेसच्या दुनियेत त्याला खूप पसंत केले जाते. साहिल खानचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्याने 2004 मध्ये इराणी-नॉर्वेजियन अभिनेत्री नेगर खानशी लग्न केले होते. मात्र, त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि अवघ्या वर्षभरातच दोघांचा घटस्फोट झाला. आता वर्षांनंतर साहिलने दुसरं लग्न करून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.