Alert! खिडक्या बंद ठेवा... मुंबईत उष्णतेची लाट आणखी तीव्र

थोडक्यात या अनपेक्षित तापमानवाढीनं मुंबईकर बेजार झाले आहेत. 

Feb 15, 2025, 13:14 PM IST

Mumbai News : मुंबईत मागील काही दिवसांपासून पहाटेच्या वेळी जाणवणारा हवेतील गारठा वगळता उर्वरित दिवसभर मात्र प्रचंड उकाडा पाहायला मिळत आहे. 

1/7

मुंबई

weather update Mumbai to experiance massive heatwave amid increased  temprature alert issued

Mumbai Heat Wave like weather : हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत पुढील 48 तासांमध्ये तापमानात प्रचंड वाढ होणं अपेक्षित आहे. 

2/7

उकाडा

weather update Mumbai to experiance massive heatwave amid increased  temprature alert issued

सहसा शिमग्यानंतर राज्यासह मुंबई शहरातसुद्धा तापमानवाढीस सुरुवात होते. पण, यंदाचं वर्ष मात्र अपवाद ठरत असून, फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच हवामानातील उकाडा वाढताना दिसत आहे.   

3/7

रात्र थंड आणि दिवस उष्ण

weather update Mumbai to experiance massive heatwave amid increased  temprature alert issued

गुरुवारी मुंबईत कमाल तापमान 36.7 अंश इतकं नोंदवण्यात आलं. शहरात सध्या रात्र थंड आणि दिवस उष्ण अशी परिस्थिती असल्यामुळं या वातावरणाचा नागरिकांना त्रास होत असून, त्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे.   

4/7

उष्णतेच्या लाट

weather update Mumbai to experiance massive heatwave amid increased  temprature alert issued

शनिवारी, रविवारी मुंबई महानगर प्रदेशात उष्णतेच्या लाटेसारखीच तापमानवाढ पाहायला मिळणार असून, अशीच काहीशी स्थिती राहील असा अंदाज वर्तवला जात आहे.   

5/7

थंड ठिकाणी राहावं

weather update Mumbai to experiance massive heatwave amid increased  temprature alert issued

या उकाड्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी शक्य तितक्या चांगल्या हवेशीर आणि थंड ठिकाणी राहावं असा सल्ला दिला जात आहे. याशिवाय त्यांना घरामध्ये, सावलीत राहावण्याचा सल्ला दिला जात असून, थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटांपासून बजाव करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.   

6/7

खिडक्या आणि पडदे दिवसा बंद

weather update Mumbai to experiance massive heatwave amid increased  temprature alert issued

अतिशय उकाड्याच्या या स्थितीमध्ये शक्यतो घराच्या ऊन येणाऱ्या बाजूच्या खिडक्या आणि पडदे दिवसा बंद ठेवण्याचा सल्ला दिला जात असून हवा खेळती ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी खिडक्या उघडणं फायद्याचं ठरेल.   

7/7

पाण्याची पात

weather update Mumbai to experiance massive heatwave amid increased  temprature alert issued

उन्हाच्या या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी खालावू नये यासाठी पुरेसं पाणी पिण्यासोबतच भरपूर ताजं आणि हलकं अन्न खाल्ल्यानंतरच घरातून बाहेर पडणं फायद्याचं असेलय. या दिवसांणध्ये पातळ, सैल, सुती, आरामदायी फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत, असंही आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.