आशुतोष गोवारीकरचे 5 'Must Watch' चित्रपट; एकाला मिळालेलं ऑस्करसाठी नामांकन
आज आशुतोष गोवारिकर आपला 61 वा वाढदिवस साजरा करत आहे. याचंच औचित्य साधून, आज आम्ही तुम्हाला त्याच्या सर्वोत्तम 5 चित्रपटांविषयी सांगणार आहोत. या चित्रपटांना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली.
Happy Birthday Ashutosh Gowarikar: आज आशुतोष गोवारिकर आपला 61 वा वाढदिवस साजरा करत आहे. याचंच औचित्य साधून, आज आम्ही तुम्हाला त्याच्या सर्वोत्तम 5 चित्रपटांविषयी सांगणार आहोत. या चित्रपटांना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/15/844614-ashutoshgovarikarppp6.jpg)
आशुतोष गोवारिकर हा हिंदी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आणि निर्देशक आहे. त्याने चित्रपटांमधून आपले विशेष स्थान निर्माण केले. खरंतर, त्याच्या कुटुंबातील कोणाचाही चित्रपटसृष्टीशी काहीच संबंध नव्हता आणि अशातच त्याने आपल्या मेहनतीने सिनेसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केली. एक अभिनेता म्हणून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली होती आणि सुरुवातीला बऱ्याच टी.व्ही शोजमध्ये तो झळकला. त्याने शाहरुख खानच्या ‘सर्कस’ आणि ‘CID’ या शोजमध्ये काम केले.
2/7
आशुतोष गोवारिकर
![आशुतोष गोवारिकर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/15/844613-ashutoshgovarikarppp.jpg)
आशुतोष गोवारिकरचा जन्म 15 फेब्रुवारी 1964 रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात झाला. आशुतोष खास करुन ऐतिहासिक चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याने बनवलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचे प्रेम तर मिळतेच, तसेच या चित्रपटातील क्रिटिक्सचीसुद्धा त्यांची प्रशंसा होते. एक अभिनेता म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि नंतर निर्देशक म्हणून आपली ओळख निर्माण केली.
3/7
जोधा अकबर
![जोधा अकबर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/15/844612-ashutoshgovarikarppp1.jpg)
'जोधा अकबर' हा त्याचा ऐतिहासिक चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशनने मुघल सम्राट अकबरची भूमिका साकारली होती आणि ऐश्वर्या राय ही जोधाच्या भूमिकेत झळकली. या चित्रपटाला 'साओ पाउलो इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल' मध्ये 'सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट' हा पुरस्कार मिळाला होता. भव्यता आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे हा चित्रपट महागड्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटांमध्ये गणला जातो. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
4/7
खेलें हम जी जान से
![खेलें हम जी जान से](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/15/844611-ashutoshgovarikarppp2.jpg)
'खेलें हम जी जान से' हा देशभक्तीपर चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण आणि सिकंदर खेर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाची कथा भारतीय स्वतंत्रता संग्रामच्या सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटातील आशुतोषच्या निर्देशनाचे प्रंचंड कौतुक करण्यात आले. हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर सुद्धा पाहू शकता.
5/7
लगान
![लगान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/15/844610-ashutoshgovarikarppp3.jpg)
2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लगान' या चित्रपटात आमिर खानची मुख्य भूमिका होती. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांकडून कर माफ व्हावा म्हणून गावकरी क्रिकेट सामना खेळतात, अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळून हा चित्रपट ब्लॉकबस्टरवर हिट ठरला. या चित्रपटाला 2002 मध्ये ऑस्कर अवॉर्ड्समधील 'सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट' या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले तसेच चित्रपटाला 8 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
6/7
मोहनजोदडो
![मोहनजोदडो](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/15/844609-ashutoshgovarikarppp4.jpg)