'बाबूजी धीरे चलना...', शिवाली परबचं निख्खळ सौंदर्य, फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री शिवाली परबने साडीमधील फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीय.

Soneshwar Patil | Feb 15, 2025, 16:28 PM IST
1/7

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. या शोमध्ये अभिनेत्रीने अनेक वेगवेगळ्या विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. 

2/7

सध्या शिवाली परबच्या आयुष्यात अशी एक गोष्ट घडली आहे. ज्यामुळे तिच्यावर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे. 

3/7

ज्यामध्ये शिवाली परबला पहिल्याच नाटकासाठी झी नाट्य गौरव 2025 पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकन मिळालं आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

4/7

ज्यामध्ये तिने म्हटलं आहे की, माझं पहिलं नाटक आणि पहिलं नामांकन.. फुलपाखरू उडतायत मनात, खरं तर रंगमंचावर जाण्याआधी जसं पोटात गोळा येतो ती जी भावना असते ती मी पहिल्यांदाच अनुभवली.

5/7

रंगमंचावर काम करण्याची मज्जा काही वेगळीच आहे. माझ्या आई बाबांनी पाहिलेलं पहिलं नाटक ते त्यांच्या मुलीचं म्हणजे माझं , थेट तुमच्या घरातून या नाटकामुळे बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा होतायत आणि त्यासाठी प्रसाद खांडेकर थँक यू सो मच..मला हे पात्र करायला दिलस, माझ्यावर विश्वास ठेवलास असं म्हटलं आहे. 

6/7

शिवाली परब नेहमी तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. या फोटोत तिने साडीवर चेक्सचा ब्लाऊज आणि केसात गुलाब लावले आहे. 

7/7

अभिनेत्री या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. इन्स्टाग्रामवर शिवालीचे लाखो चाहते आहेत.